महाराष्ट्रासह तेलंगणात गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई! दरोडा प्रकरणातील पाहिजे आरोपी जेरबंद

सोलापूर
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यामध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या शोधाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्यांच्या आधिपत्याखाली पोलिस अधिकारी – कर्मचारी यांना मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी त्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकातील अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करण्याबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेण्याकामी आदेश दिले होते.
सोलापूर उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की , मोहोळ पोलिस ठाण्याकडील दरोडा गुन्ह्यातील पाहिजे आरोपी संशयित रित्या सोलापूर ते पुणे महामार्गावरील मोहोळ येथील वैराग कडे जाणाऱ्या ब्रीज खाली फिरत आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तत्काळ बातमीच्या ठिकाणी गेले असता बातमी प्रमाणे एक संशयित रित्या फिरताना मिळून आल्याने सदर इसमास तपास पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन चौकशीच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सचिन उर्फ सच्या अभिमान ऊर्फ अभिमन्यू काळे वय वर्षे 32 राहणार एकता नगर सापगरूड गल्ली जत.तालुका जत जिल्हा सांगली सध्या राहणार यल्लमवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे सांगितले . चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्हा कबूल केला.
कबूल केलेल्या गुन्ह्यात मोहोळ पोलिस ठाणे , बार्शी तालुका पोलीस ठाणे , वैराग पोलीस ठाणे , कामती पोलिस ठाणे, महेबुब नगर ग्रामीण तेलंगणा,महेबुब नगर शहर तेलंगणा येथे आरोपींवर महाराष्ट्रासह , तेलंगणा राज्यामध्ये विविध कलमांखाली गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी सचिन अभिमन्यु ऊर्फ अभिमान काळे याच्या ताब्यातून 48 kg कॉपर वायरचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय राठोड , पोलिस हवालदार सलीम बागवान, हरिदास पांढरे, विरेश कलशेट्टी, नागेश कोणदे, व्यंकटेश मोरे, जगदीश राठोड , पोलिस कॉन्स्टेबल दिनेश पवार , योगेश जाधव , कपिल काटकर, सुनील पवार , अशोक हलसंगी, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनंदा झळके, पल्लवी इंगळे – पाटील तसेच मोहोळ पोलिस ठाण्याकडील पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश नाळे यांनी यशस्वी रित्या पार पाडली…



