crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाईची निवेदनाद्वारे मागणी

 

सोलापूर

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी विविध पत्रकार संघटनांच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि क्राईम पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले.पत्रकारांवर होणारे हल्ले ही गंभीर बाब असून, निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

 

 

 

हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असतानाही आमदार रोहित पवार यांनी एक चकारही काढला नाही या गोष्टीचे वाईट वाटले. निखिल सुक्रे यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय असून आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही, तर पुण्यात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा मनीष केत यांनी दिला. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पत्रकार संघटनांनी केली.

 

 

 

यावेळी श्रमिक पत्रकार संघांचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण, उपाध्यक्ष आफताब शेख,बनसोडे,क्राईम पत्रकार संघांचे अध्यक्ष विशाल भांगे, कोषाध्यक्ष रवि मस्के,आप्पा पाटील,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, डिजिटल मीडिया पत्रकार संघांचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, एनडीटीव्हीचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे, न्यूज 18 चे प्रतिनिधी प्रितम पंडित, जय महाराष्ट्रचे सोलापूर प्रतिनिधी रवी ढोबळे, साम टीव्हीचे विश्वभूषण लिमये,पत्रकार सुभाष कलशेट्टी,नंदकुमार येच्चे,आयुब कागदी,आप्पा बनसोडे, संदीप वाडेकर,लक्ष्मीकांत शिंदे,अनिल कांबळे,प्रमोद तुपसमुद्रे,इम्रान सगरी, संतोष कासे, रजनीकांत उपलंची,सचिन जाधव,दत्ता केरे, राजू बंडगर यांच्यासह शहरातील सर्व वृतपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button