maharashtrapoliticalsocialsolapur

महेश अर्बन बँकेकडून सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

महेश बँकेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

 

सोलापूर : प्रतिनिधी

महेश अर्बन को. ऑप बँकेकडून सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. बँकेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा माहेश्वरी सांस्कृतिक भवन येथे झाली.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अनिल सिंदगी होते. याप्रसंगी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष अनिल सिंदगी, सिद्धय्या स्वामी, रामदास फताटे, सायबर अधिकारी अविनाश पाटील, प्रियंका काळे, सचिन अंबलगी, मल्लिनाथ मसरे, शंकर पाटील, सिद्धेश्वर बमणी, गणेश पावले, प्रकाश बिराजदार, अरुणकुमार इंगळे आणि संचालक मंडळाचे हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले.

 

 

 

 

बँकेचे उपाध्यक्ष मल्लिनाथ मसरे यांनी प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. चालू अहवाल सालात बँकेचे एकूण उत्पन्न १९ कोटी ६७ लाख रुपये झाले आहे. ठेवीवरील व्याज व प्रशासकीय खर्च १४ कोटी ८६ लाख रुपये वजा जाता बँकेला ४ कोटी १४ लाख ६७ हजार रुपयांचा ढोबळ नका झाला आहे. त्यातून ९५ लाख ४६ हजार रुपयांचा इन्कम टॅक्स आणि १ कोटी ९३ लाख १३ हजार रुपयांच्या आवश्यक तरतुदी वजा करून बँकेला एक कोटी २६ लाख ८ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेचा नेट एन. पी. ए. अवघा ए
१.७३ टक्के असून बँकेने स्थापनेपासून अ ऑडिट वर्ग मिळवण्यासाठी सातत्य राखले आहे. ग्राहकांना २४ तास आधुनिक बँकिंग सेवा देण्यासाठी संचालक म्हणून डिजिटल व्यवहारांना मंजुरी दिली आहे.

 

 

 

 

 

लवकरच बँकेमार्फत मोबाईल बँकिंग, यूपीआय, आयएमपीएस, एटीएम आणि ऑनलाइन निधी हस्तांतरण यांसारख्या जलद व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही उपाध्यक्ष मल्लिनाथ मसरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी सध्या वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या सायबर शाखेच्या अधिकारी प्रियांका काळे, सचिन अंबलगी आणि अविनाश पाटील यांनी उपस्थित सभासदांना ऑनलाईन आर्थिक गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

 

 

 

 

सभेपुढील विषय पत्रिकेचे वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देवरगुडी यांनी केले. या सर्व विषयाला सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रशासनाने समाधानकारक उत्तरे दिली. याप्रसंगी सिद्धय्या स्वामी, श्रीमती अनुप्रिता अंदेली, डॉ. संजय सक्करशेट्टी यांनी बँकेच्या गुणात्मक प्रगतीचे कौतुक केले. बँकेचे संचालक असीम सिंदगी यांनी आभार प्रदर्शन केले.

 

 

 

यावेळी संचालक शंकरप्पा दर्गोपाटील, मल्लिनाथ स्वामी, शिवशरण सगुमळे, गुरुशांत ढंगे, प्रभा देवणीकर, सिद्धेश्वर जोकारे, धीरज बलदोटा, सुरेंद्र शिरकोली, शरद नागावकर, अण्णासाहेब कोतली, सिद्धेश्वर मुनाळे, डॉ. शैलेश पाटील, नितीन बिज्जरगी, सुधीर थोबडे, बाळासाहेब भोगडे, डॉ. मल्लिनाथ शिरसी, सिद्धेश्वर किणगी, मल्लिनाथ विभुते, गुरुराज माळगे, सुरेश हसापुरे, वैभव बरबडे, केदार उंबरजे, चंद्रकांत रमणशेट्टी, महेश ठेसे, श्रीशैल अंबारे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button