crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मालमत्तेच्या वादातून प्राणघातक हल्ला ; आरोपीला उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन:- ॲड. जयदीप माने…

सोलापूर

मालमत्तेच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी संदीपन भीमराव रूपनवर याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
दि. २५ जून २०२६ रोजी शेतीच्या जमिनीवरील हक्क व पिकाच्या उत्पन्नावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. फिर्यादी आणी त्याचा भावाला आरोपींनी दगड, लाथा व बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले असे सरकार पक्षाचे म्हणने होते.
आरोपीने माळशिरस सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला होता. त्यानंतर आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

 

 

 

 

 

 

या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, घटने दिवशी फिर्यादीने आरोपी संदीपान याला चाकूने मारून जखमी केले होते व त्याबाबत आरोपीच्या भावाने फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीला शह देण्यासाठी आरोपींना खोत्या गुन्ह्यात गुंतवले आहे, आरोपीच्या घरातील शाळेत हजर असणाऱ्या अल्पवयीन मुलास देखील गुंतवण्यास कमी केले नाही. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपी संदिपान रुपनवर याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

 

 

 

या प्रकरणी आरोपीतर्फ ॲड. जयदीप माने यांनी तर सरकार तर्फे ॲड. शुभांगी देशमुख यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button