शहर मध्य मतदारसंघात २५ हजार ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून पंतप्रधानांना शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार देवेंद्र कोठे यांच्यातर्फे उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त
शहर मध्य विधानसभा मतदारसंघात २५ हजार ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. स्व. राजेश अण्णा कोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गुरुवारी सायंकाळी आयोजित दीपोत्सवात आमदार देवेंद्र कोठे यांनी दिवा लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते दिवा लावून उपक्रमाचे उद्घाटन झाले. यानंतर मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘नमो सेवा २५’ अशी अक्षरे पणतीच्या साह्याने तयार केली. तसेच पणतीच्या सहाय्याने कमळाच्या फुलाची प्रतिकृती देखील बनविण्यात आली होती. यावेळी माजी नगरसेवक दीपक राजगे यांच्या हस्ते करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी कोठे परिवारातील माता भगिनीदेखील सहभागी झाल्या होत्या.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य मतदारसंघात प्रभागा प्रभागांमध्ये सर्व आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासमवेत नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या घराशेजारील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पणत्यांच्या माध्यमातून आशीर्वादाचा दिवा लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह माजी महापौर श्रीकांचना यन्नम तसेच मंडळाचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश भोसले, विनोद जक्कापुरे, प्रशांत शिंदे बडू भोसले यांनी परिश्रम घेतले.



