विंचूर येथे गॅस सिलेंडर स्फोटात देवकाते कुटुंबीयांचे घर जळून खाक; जळीतग्रस्त कुटुंबीयांना मदतीचे आवाहन महादेव कोगनुरे यांचे आवाहन

दक्षिण सोलापूर
तालुक्यातील विंचूर येथे शनिवारी गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे देवकाते कुटुंबीयांच्या घराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत घरातील साहित्य व संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज MK फौंडेशन संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त देवकाते कुटुंबीयांची घटनास्थळी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत आपल्या परीने शक्य ती मदत महादेव कोगनुरे अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे देवकाते कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले असून, त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे या कुटुंबाला सावरण्यासाठी समाजातील नागरिकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे आवाहन महादेव कोगनुरे यांनी केले.

विंचूर परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना तसेच दानशूर व्यक्तींनी देवकाते कुटुंबीयांना आपल्या परीने शक्य ती आर्थिक अथवा जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संकटाच्या काळात समाजाने एकजुटीने जळीतग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून त्यांना नव्याने उभे राहण्यासाठी आधार देण्याची गरज आहे.



