crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याप्रकरणी पतीस उच्च न्यायालयातून जामीन मंजूर:- ॲड.रितेश थोबडे…

 

सोलापूर

 

सागर मनोहर इंगोले रा. सलगर(बु) तालुका मंगळवेढा यास जीवेठार मारल्या प्रकरणे सुभाष श्रीमंत होनमुके रा राहणार मुरळी तालुका मंगळवेढा . यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की मयत सागर याची मोबाईल शॉपी होती तेथे आरोपी सुभाष ची पत्नी ही मोबाईल रिचार्ज करण्यासाठी येत होती त्यातूनच दोघांचे प्रेम संबंध जुळले होते दिनांक 25 4 2025 रोजी रात्री सागर हा घरी आला नव्हता.दिनांक 26 4 2025 रोजी सागर याचे वडील दूध घालण्यासाठी गावात गेले असता त्यावेळी त्यांना समजले की मुलगा सागर यास सुभाष व संजय यांनी मारहाण केली आहे व जखमी अवस्थेत त्यांच्या वस्तीवर पडून आहे. त्यावर मयत सागरचे वडील व इतर लोक सदर ठिकाणी गेले असता सागर हा मयत. होता व त्याच्या सर्व अंगावर जखमा होता अशा आशा याची फिर्याद मत सागर याची वडील मनोहर इंगोले यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून सुभाष यास अटक केली होती.

 

 

 

आपणास जामीन मिळावा म्हणून सुभाष याने पंढरपूर सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

त्यावर सुभाष याने उच्च उच्च न्यायालयात एडवोकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

 

 

अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस एडवोकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तीवादात पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरून सकृत दर्शनी असे दिसून येते की सदरची घटना ही पूर्वनियोजित नाही त्यामुळे आरोपी जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायमूर्तींनी 50 हजार रुपयांच्या जात मुचुलक्यावर जामीन मंजूर केला.

 

 

यात यात अर्जदार आरोपीतर्फे एडवोकेट रितेश थोबडे, एडवोकेट महादेव गायकवाड (मंगळवेढा) यांनी तर सरकार तर्फे नितीन पाटील यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button