खुनाच्या आरोपातुन पतीची निर्दोष मुक्तता:- ॲड. धनंजय माने…

हिवरगाव, ता. मंगळवेढा येथे दि. ३१/१२/२०२० रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी रुपाली (२८) हिचा लोखंडी पारेने मारुन खुन केल्याच्या आरोपावरुन पती हणमंत मच्छिंद्र माने (४०) रा. हिवरगाव याचे विरुध्द भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी पंढरपूर सत्र न्यायालयात होऊन न्यायाधिशांनी सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
आरोपी हणमंत मच्छिंद्र माने हा आपली पत्नी रुपाली व मुले रोहन व राजु यांचे समवेत मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव ते हजापुर या रस्त्यावरील शेतात राहत होता. पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला त्रास देत होता. याबाबत नातेवाईकांनी त्यांच्या तक्रारी मिटवुन समझोता केला होता परंतु पुन्हा त्या कारणावरुन पती-पत्नीत भांडणे होत होती.
घटनेदिवशी आरोपीने पत्नीला पारेने मारुन खुन केला असे सरकारपक्षाचे म्हणणे होते. आरोपीचा मेव्हणा बंडोपंत कोडग यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनला केलेल्या फिर्यादी वरून आरोप विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता . सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने , ॲड. जयदीप माने , ॲड. सिध्देश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम, ॲड. वैभव सुतार, ॲड. शिवप्रसाद ढोले यांनी काम पाहिले.



