crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

अकलूज येथील खून खटल्यात अँड. संतोष न्हावकर विशेष सरकारी वकील नियुक्त:-अँड. संतोष विठ्ठलराव न्हावकर

 

सोलापूर-

 

अकलूज येथील शेतकरी सिन्नप्पा वाघमोडे हे अनैतिक संबंधाच्या आडवे येत असल्याने त्यांचा खून केल्याप्रकरणी संतोष वाघ वगैरे दोघांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात माळशिरस येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले असून प्रस्तुत खटल्यात अँड. संतोष न्हावकर यांची महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे परिपत्रक विधि व न्याय विभागाने जारी केले आहे.
यात हकिकत अशी की, बाळू सिन्नप्पा वाघमोडे यांची तांबवे,अकलूज ता.माळशिरस येथे शेती असून संतोष बाळासाहेब वाघ याच्याकडे तीन चाकी रिक्षा असल्याने त्यास मजुरांची गरज पडेल तेव्हा त्याला सांगितले असता तो महिला मुकादम नूतन अनिल जाधव यांना व त्यांच्या टोळीतील इतर महिला मजुरांना शेतात काम करण्यासाठी घेऊन येत होता. संतोष वाघ व नूतन जाधव यांचे अनैतिक संबंध असल्याचे फिर्यादीने लोकांच्या चर्चेतून ऐकले होते.

 

 

 

 

घटनेच्या चार दिवसापूर्वी संतोष वाघ हा संतोष वाघ यास लवग येथे भेटला होता त्यावेळी त्याने तुमचे वडील व नूतन जाधव हे सारखे फोनवर बोलत असतात त्या दोघांचे काही तरी सुरू असल्याने नूतन जाधव व महिला मजुरांना कामावर आणत नसल्याचे सांगितले तसेच त्याचे मोबाईलमध्ये फिर्यादीचे वडील हे नूतन जाधव यास बोलत असल्याचे फोन लॉग मधून दाखवून फिर्यादीचे वडील हे संतोष वाघ व नूतन जाधव यांच्या नात्यामध्ये आले असून त्याने फिर्यादीच्या वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन शिवीगाळ करून निघून गेला होता.
तदनंतर दि. 20/6/2025 रोजी सकाळी 7.०० च्या सुमारास फिर्यादी नेहमीप्रमाणे बंगल्यात गेल्यानंतर त्यास फिर्यादीचे वडील झोपलेल्या जागीच डोक्यावर, छातीवर, हातावर, पायावर हत्याराने वार करून उजवा हात कोपरापासून तोडून, चेहर्‍यावर सर्वत्र वार करून चेहरा विद्रूप झालेल्या अवस्थेत रक्ताचे थारोळ्यात मयत होवून पडल्याचे दिसले अशी फिर्याद बाळू शिनप्पा वाघमोडे याने अकलूज पोलीस स्टेशन येथे दाखल केली.

 

 

 

 

प्रस्तुत खटला हा संवेदनशील व गाजलेला असल्याने न्याय मिळावा म्हणून फिर्यादी पक्षाकडील लोकांनी सरकारकडे विशेष सरकारी वकील म्हणून अँड. संतोष विठ्ठलराव न्हावकर यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी केली होती. त्यामुळे सरकारने प्रस्तुत खटल्यात अँड. संतोष विठ्ठलराव न्हावकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button