india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

घरगुती गॅसधारकांना मिळणार निम्म्या वजनाचा आकर्षक गॅस सिलेंडर

भारत गॅसतर्फे झीपलाईट सिलेंडरचे अनावरण : आकर्षक गॅस सिलेंडरला ग्राहकांची मिळतेय पसंती

 

सोलापूर : प्रतिनिधी

लाखो घरगुती गॅसधारकांना आता निम्म्या वजनाचा गॅस सिलेंडर मिळणार आहे. केंद्र शासनाच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. च्या भारत गॅसतर्फे हा नव्या पद्धतीच्या आकर्षक गॅस सिलेंडरचे अनावरण शुक्रवारी अरूणा गॅस एजन्सीमध्ये करण्यात आले.

 

 

 

या अनावरणप्रसंगी व्यासपीठावर भारत गॅसचे टेरिटरी मॅनेजर (एलपीजी) रजत बन्सल, टेरिटरी मॅनेजर (रिटेल) आर. गणपती वेंकटरमण, टेरिटरी कॉर्डिनेटर नवतेज सिंग, प्लांट मॅनेजर हर्ष मार्तंड, सेल्स मॅनेजर (एलपीजी) श्री रघुकुमार, झोनल ऑफिसर कांचन कांबळे, पूनम थोरात, अरुणा गॅस एजन्सीचे अनिल सिंदगी, असीम सिंदगी, अमित सिंदगी उपस्थित होते.

भारत गॅसचे टेरिटरी मॅनेजर (एलपीजी) रजत बन्सल म्हणाले, सध्या नागरिकांना मिळणाऱ्या भरलेल्या घरगुती सिलेंडरचे वजन ३० किलो आहे. भारत गॅसतर्फे ग्राहकांना उपलब्ध करून दिलेला भरलेला झीपलाईट सिलेंडर १५ किलोचा आहे. दुर्दैवाने आग लागली तरी हा सिलेंडर सध्याच्या सिलेंडर प्रमाणे फुटणार नाही. वजनाने हलका असल्यामुळे आणि विशिष्ट प्रकारच्या नव्या रचनेमुळे हा सिलेंडर वाहून नेण्यासाठी अतिशय सोपा आहे. याशिवाय सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे याचीही माहिती ग्राहकांना कळू शकणार आहे. विशेष म्हणजे सिलेंडरचे बुकिंग केल्यानंतर अवघ्या चार तासात हा सिलेंडर ग्राहकांना घरपोच मिळणार आहे.

हा सिलेंडर प्रीमियम सिलेंडर असून ज्या ग्राहकांकडून या सिलेंडरची मागणी होईल, त्या ग्राहकांनाच हा सिलेंडर देण्यात येणार आहे. ग्राहकांनी हॅलो बीपीसीएल ॲप मध्ये गॅस सिलेंडरसाठी नोंदणी करावयाची आहे. सध्या हा गॅस सिलेंडर अरुणा गॅस एजन्सी आणि पृथ्वीराज भारत गॅस येथे उपलब्ध असून टप्प्याटप्प्याने सोलापूर शहरात सर्वत्र हा गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे भारत गॅसचे टेरिटरी मॅनेजर (एलपीजी) रजत बन्सल यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button