crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

राज्य राखीव पोलीस बलातील एएसआय माधवराव भोसले यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर

 


सोलापूर 

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १०, सोलापूर येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधवराव वेंकटराव भोसले यांना पोलीस विभागातील उल्लेखनीय, प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.

 

 


शासकीय सेवेत प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती तसेच सोपविलेली जबाबदारी अत्यंत तत्परतेने आणि कार्यक्षमतेने पार पाडल्याबद्दल त्यांच्या सेवेची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवाकार्याची पोलीस विभागाकडून दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पदकासाठी निवड करण्यात आली आहे.

 

 


माधवराव भोसले यांच्या या गौरवामुळे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १०, सोलापूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल अधिकारी, सहकारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button