हर घर तिरंगा अभियानांतर्गत शहर मध्य भाजपातर्फे तिरंगा पदयात्रा उत्साहात
हजारो सोलापूरकरांनी केला भारतमातेचा जयजयकार

सोलापूर : प्रतिनिधी
भारत माता की जय, वंदे मातरम चा जयघोष करत हजारो सोलापूरकरांनी देशभक्तीचा हुंकार दिला. निमित्त होते हर घर तिरंगा अभियानांतर्गत शहर मध्ये भाजपातर्फे आयोजित तिरंगा पदयात्रेचे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त शहर मध्य भाजपातर्फे या तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व महापौर विनायक कोंड्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत मेकॅनिक चौक येथील आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयापासून या पदयात्रेस प्रारंभ झाला.

संपर्क कार्यालयापासून सुरू झालेली पदयात्रा सरस्वती चौक मार्गे, चार हुतात्मा चौक ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) येथे पोहोचली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रेचा समारोप झाला.

नगरसेवक, नगरसेविका,भाजपा पदाधिकारी, संभाजीराव शिंदे विद्यामंदिर, राज मेमोरियल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक तसेच सोलापूरकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.




