educationalindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

वि. मो. मेहता अन् एस. आर. चंडक हायस्कूल प्रथम

शिवस्मारकच्या देशभक्तीपर समूहगान स्पर्धेचे पारितोषिक वितरण

 

सोलापूर : प्रतिनिधी

वि. मो. मेहता प्रशाला अन् एस. आर. चंडक प्रशालेने पारितोषिकावर आपले नाव कोरले. निमित्त होते श्री छत्रपति शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे (शिवस्मारक) आयोजित देशभक्तीपर समूहगान स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे.

श्री छत्रपति शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे (शिवस्मारक) आयोजित देशभक्तीपर समूहगान स्पर्धेचे यंदाचे २७ वे वर्ष होते. पारितोषिक वितरणावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी संचालिका आणि स्पर्धाप्रमुख माधवी कुलकर्णी, परीक्षक अतुल बेले, शर्वरी कुलकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी संचालक प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

 

भारतमाता पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यानंतर शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. सर्व विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, पुस्तक देण्यात आले.

शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी प्रास्ताविक केले. संचालक प्रसाद जिरांकलगीकर यांनी सूत्रसंचालन तर कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

देशभक्तीपर समूहगान स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

गट इयत्ता पहिली ते चौथी : प्रथम – वि. मो. मेहता प्राथमिक शाळा, द्वितीय – नू. म. वि. मराठी शाळा, तृतीय – इंडियन मॉडेल स्कूल.

गट पाचवी ते सातवी :
प्रथम – वि. मो. मेहता प्रशाला, द्वितीय – श्री दिगंबर जैन गुरुकुल , तृतीय – विवेकानंद पब्लिक स्कूल, तृतीय – एस.आर. चंडक हायस्कूल.

गट आठवी ते दहावी :
प्रथम – एस. आर. चंडक हायस्कूल, द्वितीय – हरीभाई देवकरण प्रशाला, तृतीय – मल्लिकार्जुन हायस्कूल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button