crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मिरज, आळंदी अन् सोलापूर… पोलिसांच्या सापळ्यात अखेर कारफोड्या टोळी; ७ आरोपी ताब्यात..

कारफोड्या टोळीचा सोलापूर पोलिसांनी केला गेम ओव्हर; ७ आरोपींकडून ७ गुन्हे उघडकीस

यात थोडक्यात हकीकत अशी की,दिनांक ६/०७/२०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत कारच्या काचा फोडून कारमधील मुद्देमाल चोरी झाल्याची तक्रार तक्रारदारांनी दाखल केली होती. फिर्यादी प्रफुलकुमार शिवाजी शिर्के रा. गारपीरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा यांची कार ICIC बँकेच्या विरुद्ध बाजूस देगावकर यांच्या घरासमोर सार्वजनिक रोड पार्क चौक सोलापूर येथे पार्क केली होती. तदनंतर फिर्यादी दत्तात्रय सुखदेव गण पाटील यांची कार जुना पुना नाका लोकमंगल हाउस समोर पार्क करण्यात आली होती.यानंतर महेश विठ्ठल गवारे यांची कार लोटस वाइन शॉप सार्वजनिक रोडवर पार्क करण्यात आली होती.तसेच सचिन धनसिंग पवार रा.मुक्काम पोस्ट थोरवी तालुका तिकोटा जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक यांची कार सिद्धेश्वर मंदिर परिसरातील पार्क परिसरात पार्क केली होती.

 

 

 

वर नमूद फिर्यादींच्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी वाहनातील मुद्देमाल चोरून घेऊन गेला होता.याबाबत तक्रारदारांच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात चोरट्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध BNS कलम
गुन्हा ३०३(२),३२४ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

 

दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त एम राजकुमार , पोलिस उपायुक्त डॉ. प्रीतम यावलकर,सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण देवकर ,यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत , पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांचे पथक तयार करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

 

 

 

फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलविली. घटनास्थळावरील CCTV फुटेज मुळे चोरट्यांचा पर्दाफाश झाला.पोलिसांनी modus operandi of the officene च्या सहाय्याने चोरट्यांच्या चेहऱ्यांची ओळख पटवण्यात आली.

गोपनीय बातमी दाराच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला असता चोरटे मिरज येथील रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली.त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी त्यांच्याकडील पथकास घेऊन मिरज गाठले मात्र आरोपींचा शोध लागला नाही.त्यानंतर दिनांक ३०/०७/२०२६ रोजी पुनश्च: गोपनीय बातमी दाराने माहिती दिली की चोरटे आळंदी येथे फिरत आहेत. त्या प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांचे पथक आळंदी येथे गेले मात्र तिथे ही चोरटे आढळून आले नाहीत. पुनश्च घटनांच्या अनुषंगाने विचार करता सोलापुरात घटना घडल्यानंतर पुनश्च: चोरटे सोलापुरात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाईच्या अनुषंगाने जोरदार सापळा लावला.

यानंतर गोपनीय बातमी दारा मार्फत पोलिसांना माहिती मिळाली की दिनांक ६/०८/२०२६ रोजी चोरटे शहरातील कारच्या काचा फोडण्यासाठी पुनश्च: सोलापुरात येणार आहेत . याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी वरिष्ठांना माहिती कळवून त्यांच्या आदेशान्वये सापळा रचला . चोरटे पंचकट्टा ते होम मैदान रोडवर मिळून आले. षणमुगम अमरनाथन , सेरन मुकुंधन ,आनंद विश्वनाथन, बालसुब्रमण्यम,मनोजकुमार अनबलगम , कमलकन्नन गणसेन सर्वचजण राहणार तिरुचिरापल्ली तमिळनाडू यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना चौकशीच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी चलाखिने जाणूनबुजून तमिळ भाषेचा वापर करत होते. ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ३ लाख रुपये रोख रक्कम, लॅपटॉप, व वाहनातील चोरलेले कागदपत्रे आढळून आले. फौजदार चावडी पोलिसांनी आरोपींकडील मुद्देमाल हस्तगत केला. व त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला.

पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून एकूण ७ आरोपींकडून ७ गुन्हे उघडकीस आणले.

ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार, पोलिस उपायुक्त परिमंडळ डॉ. प्रीतम यावलकर, यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलिस आयुक्त अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर त्यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी शिवानंद भिमदे, कृष्णात बडूरे, रवी धेंडे,सुधाकर माने,विनोद पुजारी ,विनोद व्हटकर,कुमार शेळके , वसंत गौडनवरु, दत्तात्रय कोळवले, आयाज बागलकोटे,प्रकाश गायकवाड , मच्छिंद्र राठोड, बसवराज परिट, पंकज घाडगे , विनायक जाधव,अजय चव्हाण , सूरज सोनवलकर, नितीन मोरे ,स्वप्नील मोरे, तौसीफ शेख , सचिन बाबर, आतिश पाटील , शशिकांत दराडे, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button