BusinessEpaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

एनटीपीसी सोलापूरच्या प्रकल्प प्रमुखपदी श्री मोहन वी. यांची नियुक्ती

 

सोलापूर

दि. १० जुलै :

एनटीपीसी सोलापूर प्रकल्पाचे नवे प्रकल्प प्रमुख म्हणून श्री मोहन वी. यांनी शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी पदभार स्वीकारला.
रवी शंकर विद्यापीठ, रायपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले श्री मोहन वी. यांनी १९९० मध्ये एनटीपीसीमध्ये कारकिर्दीची सुरुवात केली. तब्बल ३६ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी ऊर्जा उत्पादन क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे.
कोरबा (छत्तीसगड), तालचेर कणीहा (ओडिशा), सिपत, सोलापूर तसेच तेलंगणातील विविध प्रकल्पांमध्ये त्यांनी यशस्वीपणे जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या व्यापक अनुभवाचा लाभ सोलापूर प्रकल्पाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यरत असलेले श्री बी. बी. पाटील यांची एनटीपीसीच्या व्यवस्थापन व संचालन (O&M) विभागात प्रकल्प प्रमुख म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी श्री मोहन वी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

पदभार स्वीकारल्यानंतर महाव्यवस्थापक (प्रचालन व अनुरक्षण) सुशांत बंडोपाध्याय, अपर महाव्यवस्थापक (तांत्रिक) श्री कृष्णा दास तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्री मोहन वी. यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button