अँड राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : दोघांची महत्त्वपूर्ण साक्षी:-विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम

सोलापूर :-
ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते* यांच्यासमोर सुरू झाली.
आज रोजी साक्षीदार सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील* यांनी आपल्या साक्षीत मयत राजेश कांबळे हा बेपत्ता झाल्याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट दाखल होती त्याचा तपास ते करीत होते दिनांक 12 06 2019 मयताचे वडील व भाऊ हे दोघे विजापूर नाका पोलीस ठाण्यात आले त्यावेळी त्यांनी बंटी खरटमल, याच्यावर संशय व्यक्त केला त्यावरून त्यांनी दोन पोलिसांना त्यांच्यासोबत पाठवून दिले व ते स्वतः देखील बंटी खरटमल याच्या घरी गेले. तेथे गेल्यावर दुर्गंधी येत होती सदर बाब सदर बाजार पोलीस ठाण्याला कळवले तेथे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस आल्यावर पोलीस आल्यावर बंटी खरटमल, याच्या घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला असता तेथे दोन पोत्यांमध्ये मयत राजेश कांबळे यांचे प्रेत आढळले.अशी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली.
तदनंतरचा *साक्षीदार उंगली मुद्रा तज्ञ के जी राठोड* यांनी आपले साक्षीत पोलिसांनी बोलल्यावर ते घटनास्थळी म्हणजे पांडुरंग वस्ती येथे गेले तेथे त्यांनी दोन पोत्यांमधील प्रेत पाहिले. तसेच घटनास्थळावर पडलेल्या बाटल्या,हत्यारे इतर वस्तू पाहिल्या. त्यातील विनेगरच्या बॉटलवर फिंगरप्रिंट्स मिळून आल्या. ते तपासल्यावर मिळालेले फिंगरप्रिंट्स हे आरोपी बंटी खरटमल याचेच आहेत अशी महत्वपूर्ण साक्षी दिली.
त्यावर आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासास साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली.
तर खटल्यास 24/07/2026 ही तारीख नेमली.
या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अँड राजेंद्र फताटे, आरोपी नंबर 2 स्वतः आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदिप माने हे काम पाहत आहेत.



