india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

एका फोनवर धावून आली माणुसकी! शिखर पहारिया यांनी भरले दीनानाथ रुग्णालयाचे संपूर्ण बिल

बाराते कुटुंबाला मोठा दिलासा

पुणे, दि. ३ :

 

संकटाच्या काळात दिलेली वेळेवरची मदत एखाद्या कुटुंबासाठी आयुष्यभराची ताकद ठरते. याच माणुसकीचा प्रत्यय पुण्यात आला. आर्थिक अडचणीत अडकलेल्या रुग्णाच्या कुटुंबासाठी एका फोनवर मदतीचा हात पुढे करत आरोग्यदूत म्हणून परिचित असलेल्या शिखर पहारिया यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील उपचाराचे संपूर्ण बिल भरून बाराते कुटुंबाला मोठा दिलासा दिला. त्यांच्या या संवेदनशील कृतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

 

 

 

पुणे येथील श्रीतेश कोठवाले यांचे जवळचे मित्र आकाश वशिष्ठ बाराते यांचे वडील वशिष्ठ शिवाजी बाराते यांच्यावर सुमारे दोन ते तीन महिन्यांपूर्वी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे दिसत होते. मात्र काही दिवसांनंतर त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आणि प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात करण्यात आलेल्या तपासणीत उच्च रक्तातील साखरेमुळे (हाय शुगर) हृदयाभोवती पुन्हा पाणी साचल्याचे स्पष्ट झाले. यामुळे हृदयावर ताण वाढला असून त्याचा परिणाम यकृतावर (लिव्हर) झाला. लिव्हरलाही सूज आल्याने तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

 

 

 

 

मात्र उपचार सुरू असतानाच रुग्णालयाचा खर्च झपाट्याने वाढू लागला. आधीच बायपास शस्त्रक्रियेचा मोठा खर्च झाल्याने बाराते कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले. अशा परिस्थितीत श्रीतेश कोठवाले यांनी आरोग्यदूत शिखर दादांशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण परिस्थिती सांगितली आणि मदतीची विनंती केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शिखर पहारीया यांनी कोणताही विलंब न करता मदतीचा निर्णय घेतला. त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील उपचाराचे संपूर्ण बिल स्वतः भरून बाराते कुटुंबाला मोठा आर्थिक आधार दिला. त्यांच्या या तातडीच्या मदतीमुळे उपचारात कोणताही अडथळा न येता रुग्णावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू ठेवणे शक्य झाले.
या मदतीबद्दल श्रीतेश कोठवाले आणि आकाश वशिष्ठ बाराते यांनी पहारीया यांचे आभार व्यक्त केले.

 

 

 

 

 

“संकटाच्या काळात अनेकजण सहानुभूती व्यक्त करतात; मात्र प्रत्यक्ष कृती करून मदतीचा हात पुढे करणारे शिखर पहारिया हे खऱ्या अर्थाने देवमाणूस आहेत. त्यांनी दिलेल्या मदतीमुळे आमच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना आर्थिक मदत, उपचारासाठी सहकार्य आणि आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिखर पहारिया सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या मदतीमुळे पुन्हा एकदा समाजात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा संदेश मिळाला आहे.
चौकट….
आश्वासन नव्हे,
कृतीतून सेवाभाव
गरजू रुग्णांच्या मदतीसाठी एका फोनवर धावून जाण्याची शिखर दादांची कार्यपद्धती अनेकांसाठी आधार ठरत आहे. आर्थिक अडचणीमुळे उपचार थांबू नयेत, या उद्देशाने त्यांनी अनेक गरजू रुग्णांना वेळोवेळी मदत केली आहे. बाराते कुटुंबाला दिलेली मदतही त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग असून, “आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष कृती हाच खरा सेवाभाव,” असा संदेश त्यांच्या कार्यातून अधोरेखित झाला आहे.

चौकट
रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी
दोन ते तीन महिन्यांपूर्वी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली होती.
त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली होती.
उच्च रक्तातील साखरेमुळे (हाय शुगर) हृदयाभोवती पुन्हा पाणी साचले.
त्याचा परिणाम लिव्हरवर होऊन सूज निर्माण झाली.
उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वाढत्या उपचार खर्चामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली.
शिखर दादांनी रुग्णालयाचे संपूर्ण बिल भरून उपचाराचा मार्ग मोकळा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button