Businesseducationalentertainmentmaharashtrapoliticalsocialsolapur

शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेची ज्योत तेवत ठेवणार” एक लाख वह्या वाटप उपक्रमाचा प्रेरणादायी शुभारंभ

 

सोलापूर, दि. २४ जून :
समाजातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निःस्वार्थ भावनेने कार्यरत असलेल्या सागर सिमेंट लिमिटेड व एम. के. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एक लाख वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ विजापूर रोड येथील सागर सिमेंट कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प या संस्थांनी केला असून, त्याच परंपरेचा भाग म्हणून यंदाही एक लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वह्यांचे वाटप करून या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

 

 

यावेळी बोलताना जनसेवक महादेव कोगनुरे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,

“गरीब विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील शिक्षणाची आस आणि त्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती पाहिल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. हे वही वाटप केवळ एक उपक्रम नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. माझ्या हातून जसे जमेल तसे हे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवण्याचा माझा निर्धार आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याच्या या प्रवासात माझा खारीचा वाटा कायम राहील.” पुढे बोलताना त्यांनी सागर सिमेंटच्या व्यवस्थापनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 

 

“समाजसेवेचे हे कार्य करण्याचे बळ मला सागर सिमेंटच्या माध्यमातून मिळते. कंपनी चे मार्केटिंग हेड श्री.राजेश सिंग साहेब व कंपनी व्यवस्थापनाचा नेहमीच भक्कम पाठिंबा लाभला आहे. तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अधिकृत डीलर्स यांच्या सहकार्यामुळेच हे कार्य मोठ्या प्रमाणात राबविणे शक्य होत आहे. त्यांच्या विश्वास, पाठिंबा आणि आशीर्वादामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे भाग्य मला लाभले आहे. यासाठी मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे,” असे त्यांनी नमूद केले.

 

या कार्यक्रमास सागर सिमेंटचे सर्व अधिकृत डीलर्स, समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

 

 

महादेव कोगनुरे संस्थापक अध्यक्ष 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia