crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सुनेच्या खूनप्रयत्न प्रकरणात सासूला उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

सोलापूर

 

 

सुनेचा रॉकेल ओतून पेटून खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मोहोळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असलेली सासू संगीता सलवदे हिच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांच्या समोर होवून न्यायमूर्तींनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
फिर्यादीचे लग्न सचिन सलवदे याच्याबरोबर २०१९ साली झाले होते. दि. २१.०४.२०२५ रोजी भांडणांमध्ये सासूने आपल्या अंगावर रॉकेल टाकून खून करण्याचा प्रयत्न केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. सासू संगीता सलवदे चा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर सेशन्स कोर्टाने फेटाळून लावला होता.

 

 

 

 

 

सदर निकालाविरुद्ध आरोपीने ॲड. जयदीप माने यांचे मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदरचा जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी असा युक्तिवाद केला की, फिर्यादी ही अपघाताने भाजलेली होती हे दवाखान्यातील कागदपत्रांवरून स्पष्टपणे दिसून येते. त्यानंतर भाजलेल्या जखमेचा गैरफायदा घेऊन तिने सासूला गुंतवलेले आहे.

 

 

 

न्यायमूर्तींनी आरोपी सासू संगीता सलवदे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला व तिला पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. नितीन पाटील यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia