crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

“शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी तब्बल ७५४८ पानांचे २४५ साक्षीदार असलेले दोषारोपपत्र कोर्टात दाखल” : ॲड. शशी कुलकर्णी…

 

सोलापूर

शासनाला खोटी कागदपत्रे दाखल करून बांधकाम कामगार पाल्य शिष्यवृत्ती मधील ३ कोटी ६३ लाख २० हजारांच्या घोटाळा प्रकरणी सोलापूर गुन्हे शाखा पोलिसांनी तपास करून तब्बल ७५४८ पानांचे २४५ साक्षीदार असलेले दोषारोपपत्र सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी पयांचे कोर्टात दाखल केलेले असून सदर प्रकरणाची प्राथमिक सुनावणी दि.२३/०६/२०२६ रोजी होणार आहे. सदर प्रकरणात आरोपीतर्फे ऍड. शशी कुलकर्णी ऍड. गुरुदत्त बोरगावकर, यांनी जामीन अर्ज दाखल केले होते तथापि ते में न्यायलयाने फेटाळले.

याची थोडक्यात हकीकत की,

बांधकाम कामगार पाल्य शिष्यवृत्तीमधील ३ कोटी ६३ लाख २० हजारांच्या घोटाळा प्रकरणी सहाय्यक कामगार आयक्त एम. आर.झोले (वय ४०) यांनी दि.४ मार्च २०२६ रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून आरोपी नोंदणी अधिकारी ए. आर.पवार (रा. कृष्णा कॉलनी, जुळे सोलापूर), एस. डी.राजपूत (रा. अंबेजोगाई “जि. बीड), यू. सी.सुर्यवंशी (रा. दक्षिण सदर बझार, सोलापूर), कंत्राटी कर्मचार एस बी. पटेल, ए. बी. कोळी, बी. टी.कारडे, एस. एन.मगर, एस. बी.सुरवसे आर. सी.पाटील,ए. सी. कटारे, सी. वी डिगगे , ए. आर.पाटील, एस. एस.परदेशी, एस. एस.हळके तसेच एजंट बी. वी. शिंदे (वय ४३ रा. पंढरपूर ), ए. एच.पाडमुखे (वय ४६ रा. कुंभारी नाका, सोलापूर), टी. एम.यादगिरी (रा. मुमताज नगर, सोलापूर), ए.संगा (रा. सोलापूर), आर. एस.मुसळे (रा. देगांव रोड, सोलापूर). ए. आर.बुगडे (रा. शेळगी अशा २० जणांविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी एकूण सात आरोपीना अटक केली आहे ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. सदर प्रकरणात पोलिसांनी तपास करुन कागदपत्रे जप्त करून वरील प्रमाणे साक्षीदारांचे जबाब घेऊन न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले आहे.

सदर प्रकरणात आरोपीतर्फे ऍड. शशी कुलकर्णी, ऍड. गुरूदत्त बोरगांवकर, ऍड. एच. आर. मुसळे ऍड.देवदत्त बोरगांवकर हे काम पहात आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia