मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी वैभव गंगणे

सोलापूर
अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय राहून सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे तसेच संघर्ष योद्धा साप्ताहिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक ,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभवजी गंगणे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी राज्याचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी ही निवड केली. त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने त्यांच्या शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे, सामाजिक प्रश्नांवर परखड भूमिका घेणारे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणारे वैभव गंगणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार , कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, प्रा. श्रीनिवास कोंडी, अनिल उकरंडे, ज्येष्ठ नेते भारत साबळे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, युवक अध्यक्ष सुहास कदम, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, प्रतिभा कांबळे, सुरेखा घाडगे, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष मनोज शेरला, श्यामराव गांगर्डे, विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत व्हसुरे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एम. एम. इटकळे, सर्फराज बागवान, निलेश कांबळे, प्रज्ञासागर गायकवाड, शत्रुघ्न माने, ॲड. अमोल कोटीवाले, महेश व्हटकर, कामगार आघाडी विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे,शिवाजी सुतार , कार्याध्यक्ष संजय सांगळे, मौला शेख, शकील शेख, सोशल मीडिया विभाग संघटक सचिन चलवादी, साजिद पटेल, आदित्य हुरळेकर, शहाबाज मुतवल्ली, जुवेद शेख, महमद पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
वैभव गंगणे यांच्या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



