शिंदे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मूर्ती प्रतिष्ठापना उत्साहात…

सोलापूर :
शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शिंदे चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या जल्लोषात करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी आमदार विजयकुमार मालक देशमुख, नगरसेवक अनंत नेता जाधव, नगरसेवक अमर मेंबर पुडाळे, नगरसेवक प्रवीण भैय्या दर्गोपाटील, उद्योजक आप्पा इटाई, प्रकाश जाधव तसेच संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्यामजी कदम हे प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रम, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीचा गौरव करत तरुणांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. तसेच सामाजिक ऐक्य आणि शिवप्रेम जपण्याचा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण परिसर भगव्या पताका, ढोल-ताशांचा गजर आणि “जय शंभूराजे”च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

या प्रसंगी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक राम भैय्या जाधव, उत्सव अध्यक्ष रोहित नलवडे, कार्याध्यक्ष सॅम बिराजदार, नियोजन प्रमुख वीरेश कलशेट्टी, सहकार्याध्यक्ष ओंकार धावणे, विश्वस्त बंटी सोनके, राजाभाऊ गेजगे, राहुल दहीहंडे, पवन आलुरे, अक्षय अण्णा जाधव, संदीप चेळेकर, रोहन जाधव, शिवराज झुंजे, महेश मिश्राम, सौदागर क्षीरसागर, राहुल कोळेकर, ललित धावणे, सागर धावणे, सागर गायकवाड, अमित निकम यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



