crimemaharashtrapoliticalsocialsolapur

२४ तासांत जबरी चोरी उघडकीस; ९.३७ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त, आरोपी अटकेत…

सोलापूर (प्रतिनिधी):

 

सोलापूर शहर गुन्हे शाखेने जबरी चोरीच्या प्रकरणात तातडीने कारवाई करत अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करून तब्बल ९ लाख ३७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या कामगिरीमुळे गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
दि. २९ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी यांच्या आई इंदुबाई साठे या रात्रीच्या वेळी घराच्या परिसरात झोपलेल्या असताना अज्ञात इसमाने मध्यरात्री त्यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेले पोत जबरदस्तीने खेचून नेले. या प्रकारात त्या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

 

 

 

घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला.
तपासादरम्यान सराफ बाजार परिसरात चोरीचे सोने विक्रीस आणणाऱ्या संशयिताला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने शेख दशरथ मोरसे (वय २०, रा. कोळेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे नाव सांगितले. पुढील तपासात त्याचा साथीदार पक्षा काळे (रा. पुणे) यालाही अटक करण्यात आली. दोघांनी मिळून सोलापूर शहरात दोन जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

 

 

आरोपींकडून सुमारे १३.०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यामध्ये मणी, पोत तसेच कानातील दागिन्यांचा समावेश आहे. जप्त मालाची एकूण किंमत ९,३७,००० रुपये इतकी आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:

 

ही कारवाई  पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) गोहर हसन, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशेष) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली व

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोळे, कैलास बुगाडे, जावेद जमादार, राजकुमार वाघमारे, अभिजित धायगुडे, काशिनाथ वाघे, आबा साळवे, धीरज सातपुते, विठ्ठल येलमार, महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे, निलोफर तांबोळी, सुमित्रा बारबोळे, चालक बाळू काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी यशस्वीपणे पार पाडली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button