crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

तृतीयपंथी आत्महत्या;सुजित जमादारला जामीन मंजूर. :- अँड. केदार न्हावकर…

 

सोलापूर-

 

बाळे येथील प्रेम प्रकरणातून तृतीयपंथीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सुजीत आप्पासाहेब जमादार रा. बाळे,सोलापूर याचा जामीनअर्ज मे. कोल्हापूर उच्च न्यायालयाने मंजूर केला.

यात हकिकत अशी की, फिर्यादी व आरोपी हे वैद्यवाडी, प्रियांका चौक, सोलापूर येथील वैद्य वाड्यात सुमारे चार ते पाच वर्षे भाड्याने राहण्यास होते त्यावेळी त्याठिकाणी राहणारा आरोपी सोबत मयत प्रकाश ऊर्फ स्विटी याची ओळख झाल्याने त्यांचे एकमेकांवर प्रेम होते ते दोघे नेहमी एकत्रित फिरायचे, बोलायाचे आरोपीने मयत प्रकाश (स्विटी) यास त्याने मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे, मी तुझ्याशिवाय ईतर कोणाबरोबर लग्न करणार नाही, असे सांगितले होते तसेच त्या दोघांनी घटनेच्या दीड ते दोन वर्षांपूर्वी लग्न केल्याबाबतचा त्यांनी विडिओ केला होता त्यानंतर सुजीत जमादार याने मयत प्रकाश (स्विटी) यास बाळे येथे वेगळी भाड्याने खोली करून दिल्याने तो मडी वस्ती सोलापूर येथे राहण्यास होता.

 

 

 

 

दि.4/12/25 रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास प्रकाश याने फिर्यादीस Whatsup वर एक व्हिडिओ पाठवले त्यात त्याने मी आत्महत्या करीत असून सुजित जमादार याने माझ्या सोबत लग्नं केले,खोटे प्रेम केले, मला घर करून ठेवले ,मला कोठेही जावू देत नाही, येवू देत नाही, माझी सगळी माणसं तोडला, माझ्या जोगती समाजापासून दूर ठेवले पण आता तो दुसरे लग्न करतोय, माझ हे होण्यास फक्त सुजित जमादार हाच जबाबदार असल्याचे व्हिडिओ पाठविले. त्यावेळी फिर्यादीने त्यास असे काही करू नको असे समजवून सांगितले असताना ही त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्याद फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.

 

 

 

 

सदर गुन्ह्यात आरोपीला पोलिसानी अटक केली होती. त्यामुळे आरोपीने जामीन मिळण्यासाठी प्रथम जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता परंतु न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात अँड. केदार न्हावकर यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता.

 

 

 

 

जामीन अर्जात अँड. केदार न्हावकर यांनी युक्तिवाद करताना केवळ लग्नाचे स्टेटस ठेवल्याने प्रकाश उर्फ स्वीटीला आत्महत्येस प्रवृत्त केले असे म्हणता येणार नसल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले सदरचा युक्तिवाद ग्राह्य़ मानून न्यायमूर्तींनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.

 

 

 

यात आरोपीतर्फे अँड. केदार न्हावकर यांनी तर सरकारतर्फे शाळगावकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button