महिलांनीही देव देश धर्म कार्यात हिरहिरीने सहभागी होण्याची आवश्यकता
साध्वी सारिकाजी परमानंद : श्रीराम नवमी निमित्त श्री सीताराम कल्याणोत्सव आणि हिंदू शौर्य पुरस्काराचे थाटात वितरण

सोलापूर : प्रतिनिधी
देशात असलेल्या आराजकतेला संपवण्यासाठी खूप काम करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता महिलांनीही देव देश धर्म कार्यात हिरहिरीने सहभागी होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन वात्सल्य ग्राम (वृंदावन) येथील साध्वी सारिका परमानंद यांनी केले. श्रीराम जन्मोत्सव समिती व अखिल भारतीय हिंदू बहुभाषिक पुरोहित संघम यांच्यातर्फे गुरुवारी श्रीराम नवमी निमित्त श्री सीताराम कल्याणोत्सव आणि हिंदू शौर्य पुरस्काराचे वितरण डॉ. हेडगेवार पटांगण येथे थाटात झाले. याप्रसंगी साध्वी सारिकाजी परमानंद यांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम ११ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून जि. प. सदस्या संस्कृती सातपुते उपस्थित होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर नगरसेवक श्रीनिवास दायमा, श्रीराम जन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय साळुंखे, अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघमचे वेणुगोपाल जिल्ला पंतलु, नगरसेवक अक्षय अंजिखाने, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, सागर अतनुरे, यतीराज होनमाने, उत्सव अध्यक्ष रामचंद्र कबाडे, कार्याध्यक्ष महेश जेऊर, योगेश कबाडे, कविता साळुंखे आदी उपस्थित होते.
साध्वी सारिकाजी परमानंद म्हणाल्या, त्यानंतर देशासाठी प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे. मुलांना कार्टून, मोबाईल दाखवण्यापेक्षा राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचायला द्यावीत. महाराष्ट्राची भूमी वंदनीय आहे. येथील संस्कृतीचा प्रसार देशभर होण्याची गरज आहे. दुर्गापूजा करण्याबरोबरच स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्यासाठी, माता भगिनींचा सन्मान वाढवण्यासाठी काम करावे, असे आवाहनही साध्वी सारिकाजी परमानंद यांनी केले.
श्रीराम जन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय साळुंखे आणि यतिराज होनमाने यांनी मनोगत व्यक्त केले. हिंदू धर्मासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हिंदू शौर्य पुरस्कार देण्यात येणार असल्याचे समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय साळुंखे यांनी सांगितले.
याप्रसंगी संजय होमकर, अमर बिराजदार, उपाध्यक्ष लक्ष्मण सरवदे, सतीश पारेली, नागेश मंजेली ,अमर गट्टी, सचिव आनंद शर्मा, मोहन जंगम, पिनू करपे, कल्याण करजगी, पूजा विधी प्रमुख श्रीनिवास जिल्ला, सहसचिव चारुदत्त हुलजंतीवाले, प्रसाद भास्कर, विश्वनाथ बदलापूरे, होमहवन प्रमुख शिवराज दासी, धार्मिक विधी प्रमुख प्रवीण मुसपेठ, कालिदास काळपगार, महादेव तुम्मा आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
———
चौकट
असा झाला श्री सीताराम कल्याणोत्सवम्
श्री सीताराम कल्याणोत्सवम् च्या प्रारंभी सीता प्रतानम आणि देवकार्य झाले. यानंतर सीताराम राजोपचार पूजन झाले. यानंतर कन्यादान संस्कार, यज्ञपवितधारण, मधुपर्क, सप्तपदी, चंद्र दर्शन, अरुंधती नक्षत्र दर्शन, भाविकांना अवभृत स्नान, आशीर्वचन झाल्यानंतर मंगलाक्षता झाल्या.
हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा




