करमाळा पोलिसांची दमदार कारवाई; सुमारे ९.३५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त, आरोपी अटकेत

सोलापूर
करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. मोटारसायकलवरून येत फिर्यादीकडील सोन्याचे दागिने हिसकावून पळालेल्या आरोपीस पोलिसांनी अटक करत सुमारे ९ लाख ३५ हजार ८२८ रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १२ मार्च २०२६ रोजी फिर्यादी मीना माणिक मेंढे (रा. शेलगाव, ता. पंढरपूर) या करमाळा येथे आल्या असताना सायंकाळच्या सुमारास महादेव मंदिराजवळ दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकलवरून येत त्यांच्या गळ्यातील सुमारे ९०.६८० ग्रॅम वजनाची सोन्याची गंठण जबरदस्तीने हिसकावून नेली. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रंजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी लक्ष्मण उर्फ फिरोज अजित शेख (रा. नेवासा, जि. अहमदनगर) यास अटक करण्यात आली.
आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे ९०.६८० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे ९,३५,८२८ रुपये) हस्तगत करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपीवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या यशस्वी कारवाईमुळे करमाळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा




