देगांव गॅस दाहिनी अखेर कार्यान्वित ! नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य गणेश वानकर यांच्या प्रयत्नांना यश….

प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य गणेश वानकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गॅस दहिनी स्मशानभूमीचा प्रश्न उपस्थित करताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि देगांव गॅस दाहिणी स्मशानभूमी झाली कार्यान्वित..
सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जवळपास 22 कोटी रुपये खर्च करून सोलापूरातील विविध भागात असलेल्या स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिनी बसवण्यात आले आहेत परंतु गेल्या साडेतीन ते चार वर्षापासून प्रशासक राज असल्यामुळे
स्मार्ट सिटी व महापालिका यांच्यातील अंतर्गत वादामुळे हा विषय गेल्या चार वर्षापासून रखडला होता सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका होतात पहिल्याच सर्वसाधारण सभेत नगरसेवक गणेश वानकर यांनी देगांव गॅस दाहिणी संदर्भात सर्वसाधारण सभेत प्रस्ताव देत प्रशासनाला धारेवर धरले सभागृहामध्ये प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले .

आणि तात्काळ देगाव गॅस दाहिणी कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आज सकाळी नगरसेवक गणेश वानकर यांनी देगांव येथील प्रतिष्ठित नागरिकांसमवे या गॅस दाहिनीला भेट देऊ गॅस दाहिनी कशा पद्धतीने कार्यान्वित होणार आहे याची इत्यंभूत माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य गणेश वानकर आणि ग्रामस्थांना गॅस दाहिणीवर अंतिमसंस्कार कशा पद्धतीने याची माहिती दिली या सदैवणीवर अंतिम संस्कार केल्यास खर्चही कमी येणार असून पर्यावरणाचा समतोल ही राखण्यात येणार आहे .

देगांव गॅस दाहिणी परिसरात काही कामे अद्याप करावयाची बाकी आहेत ती कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य गणेश वानकर यांनी प्रशासनाला दिल्या यावेळी देगांव मधील संतोष दांडगे,प्रभाकर नाना कोठे, सुधाकर भाऊ काळे,शिवाजी जाधव, योगेश कोळी,अभिजीत सावकार सुपाते, अमर कस्तुरे, संभा वाघ,गोटू ताकमोगे,नितीन कोठे,योगी कोळी,अरुण भैया जाधव, व महानगरपालिका विद्युत विभागाचे इलेक्ट्रिक इंजिनिअर प्रतीक कोल्हे उपस्थित..
हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा




