crimemaharashtrapoliticalsocialsolapur

डबल मर्डर प्रकरणी गणेश ढोबळे यांना उच्च न्यायालयात जामीन मंजूर:-ॲड. जयदीप माने

सोलापूर

 

 

गुंजेगाव, ता. मंगळवेढा येथे दि. ११/०३/२०२५ रोजी रिना आप्पासाहेब ढोबळे आणि चंद्रकांत तात्यासाहेब पाटील या दोघांचा पूर्ववैमनस्यावरुन लोखंडी कोयता, हातोडा व पाईपने मारुन खुन केल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेला आरोपी गणेश लक्ष्मण ढोबळे रा. गुंजेगाव ता. मंगळवेढा याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच ने जामिनावर मुक्तता केली.
या प्रकरणाची हकीकत अशी की, मयत रिना ढोबळे हिचे पती पाच वर्षापुर्वी निधन पावले होते. त्यानंतर ती चंद्रकांत तात्यासाहेब पाटील याच्यासोबत राहत होती. तिचे व शेजारील शेतकरी लक्ष्मण ढोबळे यांचे पाईपलाईनच्या चेंबरच्या कारणावरुन वाद होता.

 

 

 

 

याबाबत एकमेकांविरुध्द फिर्याद दाखल झाले होते. त्यामुळे आलेल्या वैमनस्यामुळे लक्ष्मण ढोबळे , गणेश ढोबळे यांचेसह सातजणांनी रिना व चंद्रकांतचा दि.११/०३/२०२५ रोजी सकाळी ०९.३० वाजता खुन केल्याच्या आरोपावरुन मंगळवेढा पोलिसांनी दोषारोप पत्रक पाठवले होते. आरोपी गणेश ढोबळे याचा जामिन अर्ज पंढरपूर सेशन्स कोर्टानी फेटाळून लावला.

 

 

 

 

होता. त्यानंतर आरोपी गणेश ढोबळे यांचेतर्फे ॲड. जयदीप माने यांनी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापुर सर्किट बेंच मध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये आरोपी गणेश ढोबळे याच्या सहभागाबद्दलच्या साक्षीदारांच्या विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिल्या.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. एन. बी. पाटील यांनी काम पाहिले.

 

हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia