maharashtrapoliticalsocialsolapur

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; रयत क्रांती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर

 

 

 

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याची तातडीने दखल घेऊन पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात द्राक्ष, डाळिंब यांसारख्या फळबागांसह खरीप हंगामातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले उत्पन्न पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याची जोरदार मागणी केली.

 

 

 

“शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकरी आणखी अडचणीत येईल,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी रयत क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button