india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत

आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा : पालकमंत्री जयकुमार गोरे आणि महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील भवानी पेठ, घोंगडे वस्ती येथील अवघ्या ९ वर्षीय समर्थ स्वामी या चिमुकल्याचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. या बालकाच्या कुटुंबियांची बिकट आर्थिक परिस्थिती पाहता या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केल्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची मदत मंजूर केली.

 

 

 

 

मंगळवारी मुंबईमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्वामी कुटुंबीयांबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली. मयत बालक हे पालकांचे एकमेव अपत्य होते. तसेच मयत समर्थ स्वामी याच्या वडिलांवर कर्करोगाचे उपचार सुरू असल्याची वस्तुस्थिती मांडण्यात आली. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचीही भेट घेऊन संबंधित कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थिती मांडण्यात आली. समर्थ स्वामीच्या वडिलांवर कर्करोगावरील उपचार सुरू असल्याने या कुटुंबाला तातडीच्या आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.

 

 

या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तात्काळ स्वामी कुटुंबाला पाच लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत मंजूर केली.
——–
कोट

संवेदनशील मुख्यमंत्र्यांचे आभार

भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज होऊन दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या समर्थ स्वामी याची आणि त्याच्या कुटुंबीयांची माहिती सांगण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती जाणून घेतली. आणि तत्काळ स्वामी कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या स्वामी कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत मंजूर केल्याबद्दल संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार.
देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button