maharashtrapoliticalsocialsolapur

काकासाहेब थोबडे फाउंडेशनच्या वतीने कायदेविषयक कार्यक्रमाचे आयोजन

. सोलापूर

 

 

काकासाहेब थोबडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित कायदेविषयक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नवोदित वकिलांचा अत्यंत आकर्षक पद्धतीने सत्कार करण्यात आला असून जवळपास ४०० वकिलांची उपस्थिती लाभली.

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांनी “प्रोफेशनल एथिक्स अँड सक्सेसफुल लीगल प्रॅक्टिस” या विषयावर सुमारे ७० मिनिटांचे प्रेरणादायी व्याख्यान दिले. या व्याख्यानातून मिळालेल्या मार्गदर्शनाची आणि नवोदित वकिलांना झालेल्या सन्मानाची सर्वत्र विशेष चर्चा रंगली. तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तर्फे सीनियर लॉयर सन्मान प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विश्वनाथ आळंगे यांचा गौरव करण्यात आला.
*ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विश्वनाथ आळंगे सरांनी बोलताना ॲड मिलिंद थोबडे यांच्या कार्याचे कौतुक करून पुरस्काराबद्दल धन्यवाद दिले.

 

 

 

 

 

 

कार्यक्रमाला सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव , सचिव बसवराज हिंगमिरे , सहसचिवा मीरा प्रसाद मॅडम , खजिनदार अरविंद देडे तसेच ॲड. हिराचंद अंकलगी, ॲड. बसवराज सलगर, ॲड. राजेंद्र फताटे , ॲड. एम. डी. बिराजदार , ॲड . महादेव गोटे, ॲड. मिलिंद हरहरे, ॲड. दीक्षित , ॲड. उजळंबे, ॲड. अजय रणश्रुंगारे, ॲड. रवी सरवदे, ॲड. जालादी, ॲड. पी. बी. गायकवाड,ॲड. आर . एस. पाटील , ॲड. मल्लिनाथ पाटील , सोलापूर बार असोसिएशनचे माजी सहसहसचिव ॲड. निदा सैफन व माजी सहसचिवा अल्का मोरे यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक ॲड. रितेश थोबडे, सूत्रसंचालन ॲड. मनोज पामुल व ॲड. शरद पाटील, त्याच प्रमाणे नवोदित वकिलांच्या वतीने ॲड. अभिषेक गायकवाड व ॲड. विनायक हरहरे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे सरांचे मनःपूर्वक आभार मानले. सरांचे व्याख्यान हे केवळ अनुभवांचे कथन नसून, वकिली व्यवसायातील मूल्ये, नैतिकता आणि यशाची दिशा स्पष्ट करणारे दीपस्तंभ ठरले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

 

 

 

प्रत्येक नवोदित वकिलाच्या मनात आत्मविश्वास जागवणारे, विचारांना दिशा देणारे आणि पुढील वाटचालीस प्रेरणा देणारे हे मार्गदर्शन आयुष्यभर उपयोगी पडेल, असे उद्गार त्यांनी काढले. तर सदर करकर्माचेआभार प्रदर्शन ॲड. श्रीप्रसाद अंकलगी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa