maharashtrapoliticalsocialsolapur

राणा प्रताप नगरात ड्रेनेजचा कहर; उपमहापौरांचा तातडीचा धडक दौरा, अधिकाऱ्यांना कडक आदेश !…

आरोग्य धोक्यात, मनपाची यंत्रणा सतर्क; ड्रेनेज लाईन तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश

राणा प्रताप नगर परिसरात निर्माण झालेल्या गंभीर ड्रेनेज समस्येमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तक्रारी मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी तात्काळ घटनास्थळी धडक भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

 

ड्रेनेज लाईन तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर व काही घरांच्या परिसरात शिरत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त केली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपमहापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने स्थळी पाचारण करत गटारांची स्वच्छता, अडथळे दूर करणे आणि आवश्यक असल्यास नवीन पाइपलाईनचा प्रस्ताव तयार करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

 

“नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. काम तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा,” असा कडक इशारा त्यांनी दिला.
यावेळी सभागृहनेते नरेंद्र काळे, नगरसेवक राजशेखर पाटील, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, अक्षय वाकसे, भाजप मंडळ अध्यक्ष महेश देवकर तसेच मनपाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली.उपमहापौरांच्या धडक हस्तक्षेपामुळे प्रशासनाने तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच समस्या मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa