india- worldcrimemaharashtrapoliticalsocialsolapur

मनपा परिसरात खाजगी वाहनांना ‘नो एन्ट्री’; ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही…

मनपा परिसरात खाजगी वाहनांना ‘नो एन्ट्री’; ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही

सोलापूर

 

 

सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने शासकीय वेळेत मनपा मुख्यालय परिसरात शासकीय वाहनांव्यतिरिक्त सर्व खाजगी वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्याचा ठोस निर्णय घेतला आहे. वाढती वाहनांची गर्दी, पार्किंगचा वाढता ताण आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना म्हणून हा निर्णय अमलात आणण्यात आला आहे.हा निर्णय महापौर विनायक कोंड्याल यांच्या आदेशानुसार तसेच आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला असून संबंधित परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. प्रशासनाने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे.

प्रवेशद्वारांवर कडक नियंत्रण

 

मनपा परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस वैध ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओळखपत्र तपासणीनंतरच प्रवेश देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मनपा इमारतीतील अनावश्यक वावर कमी होऊन कामकाज अधिक शिस्तबद्ध होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती

 

प्रवेशबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी खाजगी कंत्राटाद्वारे एकूण सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी प्रवेशद्वारांवर वाहन तपासणी, ओळखपत्र पडताळणी आणि वाहतूक नियमनाची जबाबदारी पार पाडतील.
नागरिकांसाठी पर्यायी पार्किंगची सोय
पालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हुतात्मा स्मारक शेजारील मोकळी जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मनपा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना सुलभ प्रवेश मिळेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
काही घटकांना सूट

 

 

प्रवेश द्वारावार

या निर्णयातून लोकप्रतिनिधी, पत्रकार तसेच मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांना सूट देण्यात आली आहे. मात्र, त्यांनाही प्रवेशावेळी ओळखपत्र दाखवणे अनिवार्य राहणार आहे.
मनपा प्रशासनाच्या या निर्णयामुळे परिसरातील सुरक्षा अधिक मजबूत होणार असून, अनावश्यक गर्दी व पार्किंग समस्येवर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa