maharashtraBusinesspoliticalsocialsolapur

सोलापूर विमानतळावर सुद्धा ILS व नाईट लँडिंग प्रणाली नसल्याने प्रवासी व व्हीआयपींच्या जीवितास धोका

_DGCA ने जबाबदारी AAI कडे ढकलली; सोलापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात ‘दिवसा-पुरतेच’ विमानतळ चालवणे धोकादायक – सोलापूर विकास मंच_

 

सोलापूर

प्रतिनिधी | ०५ फेब्रुवारी २०२६ :

 

 

सोलापूर विमानतळावर अद्याप Instrument Landing System (ILS) तसेच नाईट लँडिंग-टेकऑफ सुविधा कार्यान्वित नसल्याने प्रवासी, वैमानिक तसेच व्हीआयपी व व्हीव्हीआयपींच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत विकास मंच सदस्य विजय कुंदन जाधव यांनी दाखल केलेल्या सार्वजनिक तक्रारीवर उत्तर देताना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) स्पष्ट केले आहे की सोलापूर विमानतळाला सध्या फक्त Visual Flight Rules (VFR) अंतर्गत, म्हणजेच केवळ दिवसा ऑपरेशन्ससाठीच परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे ILS व नाईट लँडिंग प्रणाली सध्या नियामकदृष्ट्या बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, ILS बसवण्याचा प्रस्तावच Airports Authority of India (AAI) कडून अद्याप सादर करण्यात आलेला नसल्याची धक्कादायक बाब या उत्तरातून समोर आली आहे.

 

 

 

 

 

या पार्श्वभूमीवर एक अत्यंत गंभीर आणि प्रत्यक्ष अनुभव अधोरेखित करत विजय कुंदन जाधव यांनी सांगितले की, मागील वर्षी १५ जून २०२५ रोजी सोलापूर–गोवा ‘फ्लाय ९१’ विमानसेवेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरकडे येणार होते. मात्र, सोलापूर विमानतळावर त्या वेळी कमी दृष्यमानता (Low Visibility) असल्याने ते मुंबई विमानतळावर पोहचून सुद्धा कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. नंतर मात्र, स्टार एअरच्या सोलापूर–मुंबई विमानसेवेच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहिले.
ही घटना ILS व आधुनिक लँडिंग सुविधांचा अभाव किती गंभीर परिणाम घडवू शकतो, याचे जिवंत उदाहरण असल्याचे नमूद केले.

 

 

 

 

 

यावर प्रतिक्रिया देताना विजय कुंदन जाधव म्हणाले, “सोलापूर विमानतळावर, जिथे वारंवार व्हीआयपी व शासकीय विमानांची हालचाल असते, तिथे केवळ ‘दिवसा-पुरते’ विमानतळ चालवणे ही गंभीर निष्काळजीपणा आहे. अलीकडील विमान अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाय करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ही सूचना नसून, सुरक्षेसंदर्भातील थेट जबाबदारी निश्चित करण्याची ठोस मागणी आहे.”

 

 

 

 

ते पुढे म्हणाले की, DGCA ने तांत्रिक बाबींचा आधार घेत जबाबदारी AAI कडे ढकलली असली, तरी AAI कडून प्रस्तावच न पाठवणे हे स्पष्ट प्रशासकीय अपयश आहे. भविष्यात अचानक हवामान बदल, आपत्कालीन परिस्थिती किंवा रात्रीचे डायव्हर्जन झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवालही उपस्थित होत आहे,

जिल्हाधिकारी कार्यालय आणि सोलापूर विमानतळ प्रशासनाने या गंभीरतेची तातडीने दखल घेऊन ILS व नाईट लँडिंग सुविधांबाबत त्वरित हालचाल करावी, अशी ठाम मागणी सोलापूरकर नागरिकांकडून होत आहे. वेळीच निर्णय न घेतल्यास मोठा अनर्थ घडू शकतो, असा इशाराही या माध्यमातून देण्यात आला आहे.

 

 

 

 

 

दरम्यान, सोलापूर विकास मंचच्या वतीने AAI विरुद्ध स्वतंत्र तक्रार तसेच केंद्र सरकारकडे उच्चस्तरीय पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही विजय कुंदन जाधव यांनी स्पष्ट केले.काल सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर विमानतळावर हॅलीकॉपटर ने आले असता रात्री पुण्याला बाय रोड जाऊन मुंबई गाठावी लागली,

“अपघात झाल्यानंतर शहाणपण येण्याऐवजी, आधीच आवश्यक सुरक्षा यंत्रणा बसवणे हेच खरे जबाबदार प्रशासनाचे लक्षण आहे,” असा हा सावधानतेचा इशारा विकास मंच यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button