सदोष मनुष्यवधाच्या गुन्हातून पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता:- ॲड.शशी कुलकर्णी…

सोलापूर (सांगोला प्रतिनिधी ):-
करांडेवाडी ता. सांगोला येथील रहिवाशी सुरेश मारुती करांडे वय- 37, ब्रह्मदेव सुखदेव करांडे – 19, अशोक अंबाजी करांडे वय – 36 ,लक्ष्मण उर्फ लखन शिवाजी करांडे वय- 27 ,यशवंत पांडुरंग करांडे – 26.सर्व राहणार करांडेवाडी ता. सांगोला जिल्हा- सोलापूर यांची तलाठी कार्यालयात उतारा काढण्या वरून झालेल्या वादातून खुनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच मनुष्यवधाच्या आरोपातून पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत की, दिनांक 14/05 /2019 रोजी आरोपी पोलीस कर्मचारी सुरेश करांडे हे बुद्धेहाळ ता. सांगोला या ठिकाणी छावणी कागदपत्राची माहिती घेण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी फिर्यादी लवटे हे त्यांच्या सातबारा उताराच्या कामासाठी आले होते.त्या वेळी ,ठिकाणी दोघांमध्ये तलाठी कार्यालयातील काम कोणाचे अगोदर होणार या कारणावरून हमरी-तुमरी, शिवीगाळ व धक्काबुक्की झाली सदरचा वाद प्रचंड विकोपाला जाऊन लाठ्या सळीने मारहाण, दगडफेक व कारची तोडफोड केली. यामध्ये फिर्यादी व साक्षीदारांना गंभीर जखमा झाल्या, तसेच सदर प्रकरणात महादेव कोळेकर या व्यक्तीचा मृत्यू झाला अशा प्रकारची फिर्याद फिर्यादीने सांगोला पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती .त्याप्रमाणे खून, खुनाचा प्रयत्न व अन्य भा.द.वी कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये तपास होऊन अंतिम रित्या आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न व सदोष मनुष्यवधाचे आरोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी होऊन त्यामध्ये सरकार पक्षाचे घटनेतील साक्षीदार ,पंच ,डॉक्टर ,पोलीस कर्मचारी व अधिकारी अशा एकूण 15 जणांच्या साक्षी कोर्टात नोंदविल्या व त्याप्रमाणे आरोपींनी गुन्हा केला आहे असे म्हणून शिक्षेची मागणी सरकार पक्षाने केली.
याउलट बचाव पक्षाने युक्तिवाद केला की, साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती आहे ,कोर्टासमोर सबळ पुरावा आला नाही,डॉक्टर च्या उलटतपासणी मध्ये प्रकरणातील मयत व्यक्तीचा मृत्यू हा हृदयविकाराने झाल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच मयत व्यक्तीसोबत आरोपीचे कोणतेही वैमनस्य नाही, ही बाब न्यायालया समोर आणली. प्रकरणातील पुरावा व आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने वर नमूद पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जणांची सदोष मनुष्यवध व खुनाचा प्रयत्न या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. यात आरोपी तर्फे ॲड.शशी कुलकर्णी ,ॲड.ओंकार बुरकुल, ॲड. नवनाथ खट्टे, ॲड. प्रसाद अग्निहोत्री, ॲड. संकेत पवार यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील बेंडभर व सरकारी वकील एफ.एम. शेख यांनी काम पाहिले.
कोर्ट :- पंढरपूर सत्र न्यायाधिश- श्री. एस.जी. नंदीमठ साहेब
सत्र खटला क्रमांक :- 73/2019. जजमेंट अपलोड dt.20/11/2025
सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण




