विभागीय कार्यालय क्रमांक ६च्या हद्दीतील विविध महत्वजूर्ण विकास कामांची पालिका आयुक्तांकडून पाहणी व अधिकाऱ्यांना सूचना…

सोलापूर
सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज विभागीय कार्यालय क्रमांक ६च्या हद्दीत विविध महत्त्वपूर्ण विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
सार्वजनिक शौचालयांची पाहणी व दुरुस्तीची कामे
दमाणी नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. येथे शौचालय दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली असून लाईट व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नियमित देखभाल याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच थोबडे वस्ती येथील सार्वजनिक शौचालयालाही भेट देत स्वच्छता व सोयीसुविधांची तपासणी केली. आवश्यक तेथे तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.५४ मीटर रस्ता तसेच ५४ रस्ता-ब्रिज परिसरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी करताना आयुक्तांनी त्या कामांना गती देण्याचे आदेश दिले.

नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण सुरु असून आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांचीही आयुक्तांनी पाहणी केली. हे काम अंतिम टप्प्यात असून ३० डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या.

परिसर अधिक आकर्षक व व्यवस्थित होण्यासाठी विविध घटकांची पाहणी करण्यात आली.त्यानंतर एजीबेशन सेंटर समोरील महापालिककेच्या वर्किंग वुमेन्स हॉस्टेल व भक्त निवास प्रकल्पाचे नियोजित वर्किंग वुमेन्स हॉस्टेल तसेच रूपा भवानी मंदिराच्या मागील बाजूस प्रस्तावित भक्त निवास प्रकल्पांची पाहणी करून आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

प्रकल्पांसाठी आवश्यक कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा आदेशही देण्यात आला.या पाहणी दौर्यात नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, विभागीय अधिकारी जावेद पानगल, प्रकाश दिवाणजी तसेच प्रकाश सावंत, मनोज जाधव, सागर खरोसेकार आदी मान्यवर उपस्थित होते.महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या सर्व विकासकामांचे दर्जेदार व वेळेत पूर्णत्वासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाहणी करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उद्या बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.४२ वाजता होणार आहे. यावेळी पालकमंत्री श्री. जयकुमारजी गोरे आणि आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५
*वेळ -* सायंकाळी ५.४२ वाजता
*स्थळ -* स्व. खा. लिंगराज वल्याळ क्रीडांगण, कर्णिक नगर, सोलापूर



