maharashtrapoliticalsocialsolapur

बाळे येथे श्री खंडोबा देवाची मार्गशीर्ष चंपाषष्ठी यात्रा २६ नोव्हेंबरपासून…

 

सोलापूर :

 

 

बाळे येथील श्री खंडोबा देवाची पारंपरिक मार्गशीर्ष चंपाषष्ठी यात्रा यंदा मार्गशीर्ष शुद्ध षष्टी, बुधवार दि. २६ नोव्हेंबर २०२५ पासून उत्साहात सुरू होणार आहे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ते मार्गदर्शन पर्यंत येणाऱ्या प्रत्येक रविवारी श्री खंडोबाची यात्रा भरत असते. रविवार दि. ३०/११/२०२५, ०७/१२/२०२५ आणि १४/१२/२०२५ या तीन रविवारीसह एकूण चार दिवस यात्रा भरणार असून महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात.

 

 

यात्रा कालावधीत पहाटे ५.०० वाजता काकड आरती, तर सकाळी ८.०० वा. आणि रात्री ७.०० वा. महापूजा व अभिषेक करण्यात येणार आहे. दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या-मुरळी नृत्य, तळी-भंडारा उचलणे, भंडार खोबरे उधळणे वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ काढणे यांसह विविध धार्मिक पार पडत असतात.
यात्रा कालावधीत श्री खंडोबा देवाची मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी व यात्रेतील प्रत्येक रविवारी श्री ची पालखी ,घोडा व मानाचे नंदिध्वज मिरवणूक मोठ्या मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होते.

 

 

 

यात्रेची सांगता पौष शुद्ध षष्ठी बांगरषष्ठी शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी महाप्रसाद वाटपाने होणार असून सर्व मानकरी — पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे, गावडे आणि गावकरी तसेच भाविकांच्या उपस्थितीत प्रसाद वाटप करून यात्रेचा समारोप होतो.

 

 

चौकट

गणेश पुजारी { माजी नगरसेवक }

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीकडून दर्शन रांगेची व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस आयुक्तालय सोलापूर यांच्याकडून पोलीस बंदोबस्त तसेच सोलापूर महानगरपालिकेकडून सिटी बस सेवा, पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतेची दिवाबत्ती इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button