crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

फिर्यादी पत्नी, त्यामुळे ‘ते’ कृत्य गुन्हा नाही असा दावा करणाऱ्या नवरोबाला न्यायालयाचा दणका

सोलापूर

 

 

फिर्यादीबरोबर आपले कोर्ट मॅरेज झाले असल्यामुळे बलात्काराचा गुन्हा निष्पन्न होत नाही असा दावा करणाऱ्या तथाकथित नवऱ्याचा जामीन अर्ज बार्शी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
माढा तालुक्यातील ‘त्या’ तरुणीने मार्च २०२६ मध्ये कुर्डूवाडी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत असा आरोप केला होता की २०१६ मध्ये तिच्या घराजवळ राहत असलेल्या परधर्मीय तरुणाबरोबर तिची ओळख झाली. त्यानंतर तो तिच्या मागे लागला. १० वी चे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सन २०१८ मध्ये तिने सोलापूर शहरातील नामांकीत महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथेदेखील तो आरोपी तिला भेटायला येत होता. सन २०१८ मध्ये आरोपीने तिला सोलापूर शहरातील एका लॉजवर नेऊन तिचे इच्छेविरुध्द शरीरसंबंध केला. सन २०२५ मध्ये ती शिक्षणासाठी पुणे येथे राहत असताना आरोपी तेथे आला व तिला तुझे फोटो व्हायरल करेन असा दम देऊन तिला मुंबई, गुजरात, राजस्थान येथे पळवुन नेले.

 

 

 

पुण्यात परतल्यानंतर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ दस्त तयार केला. त्यानंतर काही दिवसानंतर तिला दमदाटी देऊन अंतरधर्मीय असल्याने कोर्ट मॅरेजसुध्दा केले. त्रास असह्य झाल्यानंतर तिने तिच्या आईवडिलांना सर्व हकीकत सांगून आरोपीविरुध्द कुर्डूवाडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. आरोपीविरुध्द पोक्सो अंतर्गत बलात्कार व बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल झाला. आरोपीस पोलिसांनी अटक केली. आरोपीने बार्शी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. फिर्यादीबरोबर आपले कायदेशीर लग्न झाले आहे त्यामुळे कोणताही गुन्हा निष्पन्न होत नाही असा दावा करत जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जास मुळ फिर्यादी पिडीत तरुणीतर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करुन प्रखर विरोध करण्यात आला.

 

 

 

 

आरोपीविरुध्द सकृत दर्शनी पुरावा आहे, आरोपीने फिर्यादीवर २०१६ साली लॉजमध्ये शरीरसंबंध केले त्यावेळी ती अज्ञान होती असे मत व्यक्त करुन न्यायाधिशांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
या प्रकरणी सरकारतर्फे ॲड. डी. डी. देशमुख, मुळ फिर्यादी पिडीत तरुणीतर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. शरद झाल्टे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia