crimemaharashtrapoliticalsocialsolapur

तरुणाचा खून केल्याप्रकरणी प्रकरणात युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर:- ॲड रितेश थोबडे…

 

सोलापूर

विनायक उर्फ हर्षल बाळकृष्ण बोजा वय 32 राहणार नवीन विडी घरकुल सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी रमेश उर्फ शाम मल्लेशम गुणतूक वय 24 राहणार राहणार विडी घरकुल सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला.

 

यात हकीकत अशी की, मयत विनायक यांने यातील सह आरोपी नागेश लागशेट्टी याचा कडून हात उसने पैसे घेतले होते ते पैसे मयताने परत दिले नसल्याने दोघात वाद झाला होता. त्यावरून नागेश याने विनायक यास जीवे ठार मारण्याचा कट रचला होता. दिनांक 27/04/2024 रोजी विनायक हा रात्री 11.45 वाजण्याचा सुमारास त्याचे मोटार सायकल वरून जात असताना तो स्वराज्य तरुण मित्र मंडळचे गणपती मंदिराजवळील मैदानात आला असता त्यास यातील अर्जदार/आरोपी रमेश व इतर 5 आरोपीनी मयत विनायक यास चाकू सिमेंटचे ठोकळेने मारहाण करून खून केला. घटनेची फिर्याद मयताची आई राधाबाई बाळकृष्ण बोजा हिने वालसंग पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी रमेश यास अटक केली होती.

 

 

आपणास जामीन मिळावा म्हणून रमेश याने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

त्यावर आपणास जामीन मिळावा म्हणून रमेश याने ॲड रितेश थोबडे यांचे मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात आरोपीचा गुन्ह्यात सक्रिय असा सहभाग नसल्याचा व्यक्तिवाद मांडला तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 20,000 रुपयाच्या जात मुचुलक्यावर जामीन मंजूर केला.

 

यात आरोपी तर्फे ॲड रितेश थोबडे, ॲड मनोज पामुल तर सरकार तर्फे ॲड एन बी पाटील यांनी काम पाहिले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia