crimemaharashtrapoliticalsocialsolapur

जीवनसाथी अॅपवर लग्नाचा बनावट बायोटाडा तयार करून अविवाहीत मुलींना लग्नाचे अमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणा-या तोतया पोलीस उप निरीक्षकास सोलापूर शहर सायबर पोलीसांकडून अटक…

सोलापूर

सध्या सोलापूर शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामध्ये सोलापूर शहर हद्दीमध्ये राहणा-या व सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना आरोपी नाव 1) वैभव दिपक नारकर वय ३१ वर्षे मुळ राह- मु.पो. गोविळ ता. लांजा जिल्हा-रत्नागिरी सद्या राहणार प्लॅट नं. १९०७/२१ स्वप्नीपुर्ती अपार्टमेंट नायगाव म्हाडा, बॉम्बे डायींग मिल कंपौड नायगाव मुंबई याने जीवनसाथी या अॅपवर स्वतःची माहिती व ओळख लपवून फिर्यादी यांना लग्नाची रिक्वेस्ट पाठवुन त्यामध्ये तो पी.एस.आय. असल्याचे व अविवाहीत असल्याची माहिती देवून बनावट बायोडाटा, पत्ता व अंगावर पोलीस उप निरीक्षकाची वर्दी घालुन काढलेला फोटो पाठवून फिर्यादीचा व फिर्यादीचे कुटूंबाचा विश्वास संपादन करून तो मुबई येथे पोलीस खात्यात अधिकारी पदावर नोकरीस असल्याचे भासवून त्याने फिर्यादीकडून त्याचा मावस भावाचा अॅक्सिडेंट झाला आहे व त्याचे उपचाराकरीता तसेच मावस भाऊ व मावशी या मयत झाले आहेत असे सांगून त्यांच्या अंत्यविधीकरीता पैसे लागणार आहेत व इतर वेगवेगळी कारणे सांगून दि. १९/०७/२०२५ ते दि.०८/०८/२०२५ रोजी पर्यंत एकूण ६३,०००/-रू इतकी रक्कम ऑनलाईन पध्दतीने वेळोवेळी मागून घेवून यातील व संबंधीत तक्रारदार यांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे म्हणून सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ११/२०२५ भारतीय न्याय संहिता-२०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम-२००० चे कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे दि.०५/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर एक्स्पर्ट टिमने तांत्रिक विश्लेषण व इतर पुरावे याव्दारे तपास पथक मुबईला पाठवून आरोपीत नामे १) वैभव दिपक नारकर वय-३१वर्षे राह- मु.पो. गोविळ ता. लांजा जिल्हा रत्नागिरी सद्या राहणार प्लॅट नं.१९०७/२१ स्वप्नीपुर्ती अपार्टमेंट नायगाव म्हाडा, बॉम्बे डार्थीग मिल कंपीड नायगाव मुंबई याचा शोध घेवून त्यांना त्यांचे राहते परिसरातुन शिताफीने अटक केली आहे. या आरोपीतांकडुन पोलीस कोठडीदरम्यान चौकशी मध्ये अटक आरोपीताने वरिल गुन्हयाप्रमाणेच महाराष्ट्रामधील मुंबई तसेच इतर जिल्हयातील ७ते ८ मुलींना अशाच प्रकारचे जीवनसाथी अॅपवर तो अविवाहीत व पोलीस उप निरीक्षक असलेबाबत खोटी माहिती देऊन त्यांचेशी विवाह करण्याबाबत बोलणी करून त्यांनाही वेगवेगळी कारणे सांगून त्यांची मोठयाप्रमाणात आर्थिक फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

 

 

 

तसेच रत्नागिरी व मुबई परिसरातील ४० ते ५० मुलांशी संपर्क करून तो स्वतः पी.एस.आय. असल्याचे सांगून मंत्रालयातील व पोलीस खात्यातील बरेच पोलीस अधिकारी त्याचे चांगल्या परिचयाचे असल्याचे सांगून संबधीत मुलांना पोलीस खात्यात व मंत्रालयामध्ये शासकीय नोकरी लावण्याचे अमिष दाखवून त्यांची देखील मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

 

ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम. राजकुमार पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) . डॉ. अश्विनी पाटील , सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), राजन माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्रीशैल गजा सोबत पोलीस उप-निरिक्षक नागेश इंगळे, पोहेकाँ/१३४८ कृष्णात जाधव, पोहेकॉ/१३८१ निलेश गंगावणे, चापोकॉ/४४४ नितीन आसवरे व पोहेकाँ/२०८ मच्छिद्र राठोड यांनी पार पाडली आहे.

आवाहन

तरी सोलापूर शहरातील सर्व नागरीकांनो आपण सर्वांनी सावध राहून अशा प्रकारच्या फसवणूकीपासून बचाव करावा. जीवनसाथी अॅप किंवा इतर कोणत्याही सामाजिक माध्यमांवर एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधताना त्याच्या ओळखीची खात्री करून घ्यावी. कोणत्याही व्यक्तीने पैसे मागितल्यास किंवा खोटी माहिती दिल्यास त्याची तक्रार त्वरीत पोलीसांकडे करावी आपली सुरक्षा आणि सावधानी हेच आपले सर्वात मोठे धन आहे. आपण सर्वानी एकत्रितपणे अशा प्रकारच्या गुन्हयाना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे व अशा प्रकारचे प्रसंग आपणासोबत घडत असल्यास त्वरीत सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधवा. असे सोलापूरातील तमाम नागरिकांना सोलापूर शहर सायबर पोलीसांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button