crimemaharashtrapoliticalsocialsolapur

फौजदाराशी झोंबाझोंबी करून सरकारी कामात अडथळा, माजी नगरसेवकाची निर्दोष मुक्तता:- ॲड. शशी कुलकर्णी

सोलापूर

 

दिनांक २८/०६/२०१६ रोजी फौजदार विश्वास भांबड हे कर्तव्यावर असताना ऑडी गाडी अडविल्याच्या व दंड केल्याच्या कारणावरून झोंबाझोंबी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे गुन्ह्यातून सोलापूर येथील सत्र न्यायालयाने माजी नगरसेवक नागेश लक्ष्मण ताकमोगे, रा. सोलापूर यांची निर्दोष मुक्तता केली.

 

याची हकीकत की, दिनांक २८/०६/२०१६ रोजी सदर फौजदार भांबड हे शहर वाहतूक विभाग अंतर्गत बालाजी सरोवर समोरील ठिकाणी ड्युटी कर्तव्यावर असताना त्यांना एका काळया रंगाची नंबर प्लेट नसलेली ऑडी कार निदर्शनास आली, त्यामुळे त्यांनी ती गाडी अडवून नंबर प्लेट व कागदपत्रांची विचारणा केली व त्यानंतर त्यांनी कागदपत्रे न बाळगणे, नंबर प्लेट न लावणे यासाठी दंडात्मक कारवाई केली. त्यावर त्या भागातील नगरसेवक ताकमोगे यांनी सदर फौजदारास एकेरी भाषेत अर्वाच्च बोलून माझ्या गाडीला पावती फाडतोस का? असे म्हणून, शिवीगाळ करून, त्यांच्याशी झोंबाझोंबी करून सरकारी कामात अडथळा केला अशा आशयाच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता.

 

 

त्यामध्ये तपास पूर्ण होऊन पोलीस निरीक्षक ए. डी. फुगे यांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी सत्र न्यायालयात झाली, त्यामध्ये फौजदार भांबड, पंच, पोलीस साक्षीदार यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी झाल्या, त्यामध्ये सरकार पक्षातर्फे आरोपीस शिक्षा करण्याचा युक्तिवाद करण्यात आला तर आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, गर्दीचे ठिकाण असून सुद्धा स्वतंत्र साक्षीदार नाही., साक्षीदारांच्या साक्षीमध्ये प्रचंड विसंगती आहेत., प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज जमा केले नाहीत, प्रकरणात आरोपीवर ठेवलेला आरोप सिद्ध होत नाही असा युक्तिवाद करण्यात आला.

 

 

प्रकरणातील साक्षीदारांच्या साक्षीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होत नसल्याने सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. पी. बी. लोंढे पाटील, ॲड. अभिषेक गुंड, ॲड. प्रसाद अग्निहोत्री, ॲड. आदित्य आदोने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. दत्ता पवार यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa