maharashtrapoliticalsocialsolapur

पालिका आयुक्त सचिन ओम्बासे व त्यांच्या शिष्टमंडळाने दिली मुंबई महानगरपालिकेला भेट घेतला कार्य पद्धतीचा आढावा…

 

सोलापूर

सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी मंडळाने आज मुंबई महानगरपालिकेला भेट दिली. या भेटीचा उद्देश सोलापूर शहरातील आपत्ती व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रगत प्रणालीचा अभ्यास करणे हा होता.

या भेटीदरम्यान मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. महेश नार्वेकर यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन यंत्रणा, अपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, तसेच विविध तांत्रिक साधनांचा वापर याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली.

संचालक नार्वेकर यांनी सांगितले की, मुंबई शहरात मान्सून काळात येणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील जलनिस्सारण प्रणालीवर मोठा ताण येतो. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सिस्टम (SWD), ओपन ड्रेनेज व रोड साइड ड्रेनेज यांसारख्या विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी दीड मीटर ते सहा मीटर व्यासाचे मोठ्या आकाराचे पाइप वापरले जातात. तसेच अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम साठी अत्याधुनिक मशीनरीचा वापर केला जातो.

अधिकाऱ्यांनी पंपिंग स्टेशन, STP (Sewage Treatment Plant), नाले खोलीकरण प्रक्रिया, तसेच ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असते त्या ठिकाणी उभारलेल्या पंपिंग स्टेशनचे कार्यप्रणाली याची माहिती घेतली. तसेच, फायरेक्स मशीनद्वारे मातीसह पाणी ओढून घेण्याची पद्धत, ड्राय वॉटर पंप, सुपर सकर मशीन, आणि जेटिंग मशीन यांच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

मुंबईतील स्थानिक रेल्वे व्यवस्थापन, पाणीपुरवठा प्रणाली, समुद्राजवळील पंपिंग स्टेशनद्वारे पाणी सोडण्याची प्रक्रिया, तसेच जुन्या ब्रिटिशकालीन पाइपलाइन प्रणाली यासंबंधीही सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांविषयी, बांधकाम परवानग्यांच्या अटी, आणि बिल्डरच्या जागेतून जाणाऱ्या नाल्यांच्या व्यवस्थापनाबाबतही चर्चा झाली.

या भेटीद्वारे सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन, नाला स्वच्छता, जलनिस्सारण व्यवस्था, आणि मान्सूनपूर्व नियोजन याविषयी महत्त्वपूर्ण तांत्रिक व प्रशासनिक माहिती मिळाली असून, ही माहिती सोलापूर शहरात प्रभावीपणे राबविण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला.

यावेळी संदीप कारंजे – अति. आयुक्त-२,आशिष लोकरे उपायुक्त-३, मुंबई महापालिकेचे श्रीधर चौधरी – मुख्य अभियंता (एसडब्ल्यूडी) सुनीलदत्ता रसाळ – उपमुख्य अभियंता (एसडब्ल्यूडी) सिटी,वनीता कोकाटे – उपमुख्य अभियंता (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) एसडब्ल्यूडी,दीपक खिलारी – सहाय्यक अभियंता (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) एसडब्ल्यूडी,राहुल शिंदे – सहाय्यक अभियंता (प्रकल्प) एसडब्ल्यूडी,सचिन भुर्के – उपअभियंता (एसडब्ल्यूडी)सारिका आकुलवार – नगर अभियंता, तपन डंके – नियंत्रण अधिकारी,उपाभियता नीलकंठ मठपती प्रकाश दिवाणजी – सहाय्यक अभियंता (रस्ते विभाग) सलीम बक्षी – विभागीय अधिकारी (वि.का.ृ.३)मनोज जाधव – कनिष्ठ अभियंता (नगर अभियंता विभाग)विक्रम पाटील – कनिष्ठ अभियंता (वि.का.ृ.५),राहुल गदवालकर – कनिष्ठ अभियंता (सहायक ड्रेनेज विभाग),निलेश कुंभार – ड्रेनेज मेंटेनन्स सुपरवायझर / आरोग्य निरीक्षक, किरण पाटोलकर – सल्लागार (भू-मापन व मालमता विभाग)गोकुळ तिवारी – एनव्हायरसेफ कन्सल्टंट (सल्लागार) चंद्रकांत गुंडे – एनव्हायरसेफ सल्लागार , राहुल म्हेत्रे { कनिष्ठ अभियंता }ड्रेनेज विभाग यांच्या सह मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button