maharashtrapoliticalsocialsolapur

आपला प्रभाग स्वच्छ आणि सुंदर बनविण्याकडे मोठे पाऊल, अनंत (नेता) जाधव यांच्या प्रयत्नांना अखेर आले यश…

.

 

सोलापूर : प्रतिनिधी

प्रभाग क्र. 4 मधील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार अखेर दुर्गंधीमुक्त परिसर व स्वच्छ पिण्याचे पाणी या मूलभूत सोयीसुविधांच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण कामास सुरुवात होत आहे. गेल्या 40 वर्षांपासून जीर्ण झालेल्या ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईपलाईन बदलण्याच्या मागणीस अखेर यश आले असून, लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने व प्रभागातील जनतेचे लाडके नेते अनंत (नेता) जाधव यांच्या अथक पाठपुराव्या मुळे तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

 

या निधीतून नवीन पाणीपुरवठा लाईन व ड्रेनेज लाईन कामाचे उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, मराठा वस्ती, भवानी पेठ, सोलापूर येथे होणार आहे.

 

या कार्यक्रमाचा शुभारंभ शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते होणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक विनायक विटकर, राजाभाऊ काकडे, सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड, गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

या उपक्रमामुळे प्रभाग क्र. 4 मधील रहिवाशांना स्वच्छ पाणी आणि आरोग्यदायी वातावरण लाभणार आहे. अनंत (नेता) जाधव यांच्या पुढाकाराने हाती घेतलेले हे काम ‘आपला प्रभाग स्वच्छ आणि सुंदर प्रभाग’ या संकल्पनेला बळ देणार असून नागरिकांमध्ये समाधानाची लाट पसरली आहे.

 

 

स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत, “गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या आता सुटणार असल्याने आमचा परिसर खऱ्या अर्थाने बदलणार आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia