crimemaharashtrapoliticalsocialsolapur

महिला पैलवान जयंती पवार मृत्यू प्रकरण : पती पै. प्रतापसिंहला उच्च न्यायालयात जामीन:- ॲड. जयदीप माने…

खंडाळी, ता. मोहोळ येथे दिनांक २९.०९.२०२४ रोजी घडलेल्या महिला पैलवान जयंती प्रताप पवार हिच्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेला तिचा पती प्रसिद्ध पैलवान प्रतापसिंह दत्तात्रय पवार, रा. खंडाळी, ता. मोहोळ याची मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंच चे न्यायमूर्ती शिवप्रसाद डिगे यांनी जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

 

 

या प्रकरणाची हकीकत अशी की, आरोपी पैलवान प्रतापसिंह दत्तात्रय पवार हा कोल्हापुर येथे कुस्ती खेळण्यासाठी जात होता. कोल्हापूर येथे राहणारी जयंती पवार ही देखील पैलवान होती. त्यांच्यात ओळख झाली व प्रेम संबंध निर्माण झाले. दोघांचा प्रेमविवाह ३१.०७.२०२३ रोजी नरसोबावाडी येथे पार पडला. त्यानंतर ती सासरी खंडाळी येथे नांदण्यास आली. लग्नानंतर सहा महिन्यापासून पती प्रतापसिंह आणि सासू-सासर्‍यांनी लग्नात आम्हाला काही मिळाले नाही म्हणून तिला त्रास देण्यास चालू केले आणि त्यामुळे तिने २९.०९.२०२४ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली असा आरोप तिच्या वडिलांनी मोहोळ पोलिस स्टेशन इथे दिलेल्या फिर्यादीत केला होता.

 

 

 

आरोपी प्रतापसिंह याचा जामीन अर्ज सोलापूर सेशन्स कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानंतर आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीचा प्रेमविवाह आहे त्यामुळे हुंडा मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, खटल्याचा तपास पूर्ण झालेला आहे .

 

 

 

त्यामुळे आरोपीची जामीनवर मुक्तता करावी असा युक्तिवाद उच्च न्यायालयात आरोपी वकील ॲड. जयदीप माने यांनी केला.
या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. पी.एस. राणे यांनी काम पाहिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button