crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अँड राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : तिघांच्या महत्त्वपूर्ण साक्षी

 

सोलापूर :- ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते यांच्यासमोर सुरू झाली.

 

यातील *माजी नगरसेवक प्रवीण उत्तमराव निकाळजे* याने आपले साक्षीत दिनांक 10 /06/2019 रोजी यातील आरोपी बंटी खरटमल व सुरेश चव्हाण हे त्यांच्या घरी आले “दादा आम्हाला वाचवा आमच्या हातून एक गुन्हा घडला आहे असे म्हणाले “त्यावर त्यांनी तुम्ही पोलिसांकडे जा म्हणून हाकलून दिले . त्यानंतर दिनांक 13 /06 /2019 रोजी वर्तमानपत्रात आलेल्या आलेल्या बातमी वाचून स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत सांगितली अशी महत्त्वपूर्ण साक्ष दिली.

 

 

तदनंतरचा *साक्षीदार अनिल अंबादास गायकवाड* याने आपले साक्षीत त्याने मयत राजेश कांबळे यांच्या मरणोत्तर पंचनामे वेळी शवागृहामध्ये मयताचे धड, दोन हात, दोन पाय व मुंडके होते मयतास त्याचा भाऊ मिलिंद कांबळे यांनी ओळखले तसा पंचनामा केला अशी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली.

 

 

  1. तिसरा *साक्षीदार डॉक्टर सुशीम वाघमारे* याने आपल्या साक्षीत दि:- 12/06/2019 रोजी दोन पोत्यामध्ये मयताचे अवयव आले होते एका पोत्यात धड तर दुसऱ्या पोत्यामध्ये मयताचे मुंडके दोन हात दोन पाय असे होते. मयताच्या डोक्यास एकूण पाच जखमा होत्या व त्या गंभीर जखमा होत्या. त्या जखमा या जप्त केलेली हत्यारे कोयता, सत्तुर, व लोखंडी हातोड्याने होऊ शकतात. तसेच त्यांनी मयताचे डी.एन.ए सॅम्पल देखील काढले होते. मयताच्या मृत्यूचे कारण हे त्याच्या डोक्यात झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाला अशी महत्वपूर्ण साक्ष नोंदवली.

 

त्यावर आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासास साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली.*तर डॉक्टरांच्या उलट तपासास उद्या म्हणजे 19/09/2025 ही तारीख नेमली.

*या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अँड राजेंद्र फताटे, आरोपी नंबर 2 स्वतः आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदिप माने हे काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia