जैन कौटुंबीक न्यायालय समिती च्या जिल्हा अध्यक्षपदी केतनभाई शहा यांची नेमणूक…

.
.
सोलापूर
भारतीय जैन संघटना (BJS) ने समाजातील वाढत्या वैवाहिक समस्या लक्षात घेता “जैन कुटुंब न्यायालय” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे औपचारिक उद्घटन संस्थापक श्री. शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
आजच्या काळात जैन समाजात कुटुंबातील मतभेद, वैवाहिक कलह, घटस्फोटाच्या टप्प्यावर पोहोचलेली प्रकरणे तसेच मानसिक छळ यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा प्रसंगी कुटुंबातील वाद संवाद, समुपदेशन आणि न्याय्य मार्गाने सोडविण्यासाठी “जैन कुटुंब न्यायालय” हा एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.

१९९० ते २००६ या काळात BJS ने “जैन कुटुंब लवाद” या उपक्रमाद्वारे हजारो प्रकरणांचे यशस्वीरित्या निराकरण केले होते. त्याचा अनुभव आणि आजच्या परिस्थितीचे भान ठेवून “जैन कुटुंब न्यायालय” ही सुधारित आवृत्ती आता संपूर्ण समाजासाठी उपलब्ध करून दिली आहे.

प्रारंभी महाराष्ट्र राज्यातून या उपक्रमाची सुरुवात होत असून,राज्य भरात 33 जिल्ह्यात जिल्हा पातळीवर 23 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.त्या समिती मध्ये समाजातील प्रतिष्टीत व्यक्ती,रिटायर्ड न्यायाधीश,समाजातील वकील व एक महिला सदस्य अश्या प्रत्येक जिल्हा समितीत अध्यक्ष, सचिव व तीन सदस्यांचा समावेश असणार आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी समितीचे अध्यक्षपद हे जे बिजेएस चे राज्य अध्यक्ष आहेत व अनेक सामाजिक संस्थे मध्ये सेवा देणारे श्री केतनभाई महेंद्रभाई शहा यांना सोपविण्यात आले आहे, सचिव पदी अभिनंदन विभूते,सदस्य पदी ऍडवोकेट सौ संजीवनी सुशील शहा,प्रविणभाई बालदोटा (जेऊर) व सौ संतोष रमेश बंब यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
त्यांचा कार्यकाळ 2025 ते 2027 असा 2 वर्षाचा असेल.
BJS च्या मुख्य कार्यालय पुणे येथे अर्ज व समस्यांवर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम विभाग स्थापन करण्यात आला आहे. समाजातील ज्यांना गरज आहे, ते पोलीस व कोर्टात जाण्या पूर्वी या कोटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून मदत घेऊ शकतील.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील असंख्य वैवाहिक प्रश्न शांततेत,गुप्ततेत आणि सन्मानाने सोडवले जातील, असा विश्वास संस्थापक श्री. शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला यानी केतनभाई शहा व समिती सदस्यांना शुभेच्छा दिल्या,,,



