सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची पुणे महानगरपालिका उपायुक्तपदी पदोन्नती…

सोलापूर
महानगरपालिकेचे अतिरिक्त रवी पवार यांची बदली झाली असून आता त्यांना पदोन्नती मिळाली आहे . याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी – छापवाले यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक सोमवारी जाहीर केले..
अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याकडे
जबाबदाऱ्या: सामान्य प्रशासन विभाग (भांडार विभागासह), विद्युत विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, क्रीडा कार्यालय, नगरपालिका सचिव कार्यालय, संगणक विभाग, विभागीय कार्यालय क्रमांक ७ याची जबाबदारी होती .
*रवी पवार यांची भूमिका व कामे …*
महानगरपालिकेतील स्वच्छता, घन कचरा व्यवस्थापन, विद्युत पुरवठा, सामान्य प्रशासन व इतर उपविभागांचे काम त्यांच्यावर नियंत्रण व देखरेख आहे.
“धूळ मुक्त सोलापूर” अशी मोहीम राबवण्यास त्यांचे पुढाकार असल्याचे वृत्त आहे.
महानगरपालिकेच्या विविध सामजिक उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत, जसे की स्वास्थ्य चाचण्या, पौष्टिकता, शाळा-उपशिक्षण, पर्यावरण संवर्धन व सार्वजनिक स्वच्छतेशी संबंधित कार्यक्रम.
*विभागांची जबाबदारी*
सामान्य प्रशासन (भांडार विभागासह) प्रशासनिक कामे, स्टोअर्स व्यवस्थापन इत्यादी.
विद्युत विभाग शहरातील विद्युत पुरवठा, लाईटिंग इत्यादी.
घनकचरा व्यवस्था कचरा गोळा करणे, वस्त्रोद्योग व्यवस्था, कचरा प्रक्रिया इत्यादी.
क्रीडा कार्यालय शहरातील क्रीडा सुविधांची व्यवस्था, इव्हेंट्स, मैदानांची देखभाल इत्यादी.
नगरपालिकाआ सचिव कार्यालय व संगणक विभाग शाळा, सचिवालय कार्ये, तांत्रिक सुविधा, डिजिटल सुविधा इत्यादी.
कार्यकाळात आयुक्त , इतर विभागाचे अधिकारी – कर्मचारी , विविध सामाजिक संघटना , विविध राजकीय पक्ष , सोलापूरकरांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी विशेष आभार प्रकट केले.
दरम्यान अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची पुणे महानगरपालिका उपायुक्त पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल आयुक्त, महानगरपालिकेचे अधिकारी – कर्मचारी, व सोलापूरकरांनी पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत….



