crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांचा हॅट्रिक दणका…

अखेर पीडितांना दिले न्याय....

सोलापूर

 

मोदी परिसरातील ड-25 या उत्तर भाग ग्राहक सोसायटीच्या रेशन दुकानात गुरुवारी ग्राहकांना धान्य वाटपावेळी तांदळाच्या पोत्यामध्ये मृत साप आढळला होता. यात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल रेशन दुकानाचा परवाना रद्द का करू नये, याबाबत 24 तासात उत्तर देण्याची नोटीस अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी बजावली होती. परंतु दोषी दुकानदाराने 24 तास उलटले तरी अद्याप नोटीसीला निष्काळजी करत उत्तर दिले नाही. त्यामुळे आता अन्नधान्य वितरण अधिकारी दोषी दुकानदारावर ॲक्शन मोडवर येत रास्त भाव धान्य दुकानाचे अनामत रक्कम जप्त तसेच प्राधिकार पत्र रद्द करण्यात आलेले आहे.

 

 

तांदळात मृत साप आढळूनही गाफिल राहिलेले रेशन दुकानदार आता नोटीसीला उत्तर देण्यातही हलगर्जीपणा दाखवित असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते,
दिलेल्या नोटिसातही सदर दुकानदाराने भारतीय खाद्य निगम कडून ज्या प्रकारे धान्य आले आहे त्याच प्रकारे धान्य वाटप केल्याचे असे निष्काळजी पणे उत्तर दिलेले आहे.यावरून त्यांना नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येत आहे, त्या अनुषंगाने पुरवठा विभागाची बदनामी होऊन प्रतिमा मलिन होत असल्याचे ठपका अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी सदर निलबित आदेशात मांडली आहे.

 

 

अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी केलेल्या कारवाईवर मोदी परिस्थितीत सदर दुकानातील शिधापत्रिका देणार न्याय मिळवून त्यांनी ओंकार पडोळे यांचे आभार व्यक्त केले आहेत. यापूर्वीही ओंकार पडोळे यांनी ब विभागातील साधना सर्व व्यवसाय ब 34 व क विभागातील निकिता सर्व व्यवसाय क-104 तसेच आता ड विभागातील उत्तरभाग ग्राहक सोसायटी ड – 25 हे दुकान निलंबित करून हॅट्रिक पटकावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button