राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष प्रवेशा बाबत सुधीर खरटमल यांचा विशेष सत्कार.

सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूरचे जेष्ठ राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुधीर खरटमल यांचा काही दिवसापूर्वी अजित पवार गटामध्ये अजित पवार, सुनील तटकरे,दत्तामामा भरणे, रूपाली चाकणकर आणि सोलापूरच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसमोर पक्षप्रवेश झाला होता. या पक्षप्रवेशामुळे सोलापुरातील राजकारणामध्ये जोरदार चर्चा झाली.
सोलापुरात सुधीर खरटमल आल्यानंतर अजित पवार गटाचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, किसन जाधव, माजी नगरसेवक तौफिक शेख, विवेक खरटमल, अल्पसंख्यांक विभागाचे वसीम बुऱ्हाण, सूर्यकांत शेरखाने, सुनील इंगळे, प्रवीण वाडे, ज्ञानेश्वर सोनवणे, आनंद मुस्तारे, इरफान शेख, द्वारकाप्रसाद तावनीया, रामप्रसाद शागालोलू, रोहित खिलारे, राकेश सोनी, विश्वभूषण कांबळे, शक्ती कटकधोंड यांच्या उपस्थितीत सुधीर खरटमल यांचा फेटा बांधून,मिठाई भरवून आणि फटाक्याचे आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार , कार्याध्यक्ष जुबेर बागवान, आरिफ शेख प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि स्वतः सुधीर खरटमल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुधीर खरटमल यांच्या समर्थकांकडून भव्य आतषबाजी करण्यात येऊन मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.



