crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवप्रकाश कृषी विज्ञान मंडळाचा सामाजिक उपक्रम ! टंचाईग्रस्त गावांसाठी २० टेम्पो ओला चारा आणि पाण्याचे टँकर रवाना ; महापौरांकडून तोंडभरून कौतुक !

सोलापूर – ( प्रतिनिधी ) –

 

सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.अन्नदाता शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहे.भीषण दुष्काळी परिस्थितीत देगावच्या शिवप्रकाश कृषी विज्ञान मंडळाच्यावतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वाढदिवस शेतकरी व पशुधनाला डोळ्यासमोर ठेऊन दत्तात्रय वानकर यांनी राबविलेला सामाजिक उपक्रम अत्यन्त स्थुत्य असून अन्य सामाजिक संघटनांनी शिवप्रकाश मंडळाचा आदर्श घेऊन दुष्काळामध्ये शेतकरी व जनावरांना मदत करण्यासाठी पुढे यावे ,असे आवाहन ,महापौर विनायक कोंड्याल यांनी केले.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार ( भाऊ ) गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवप्रकाश कृषी विज्ञान मंडळाच्यावतीने गुरुवारी देगाव येथे दुष्काळग्रस्त शेतकरी बांधव आणि पशुधनासाठी टँकरद्वारे पिण्याचे पाणी व चारा वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता .

 

 

 

 

 

या उपक्रमाचे उदघाटन महापौर कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आला,यावेळी ते बोलत होते. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो,या भावनेतून वानकर परिवाराने सोलापूर जिल्ह्यात सर्वात प्रथम शेतकरी व पशुधनासाठी प्रथम पाऊल उचलले आहे.पालकमंत्री गोरे हे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कायम झटत असतात,असेही महापौर यावेळी बोलताना म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यात कधी नवे इतका मोठा दुष्काळ पडलेला आहे.शिवप्रकाश मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत शेतकरी व पशुधनासाठी उपक्रम राबवून पालकमंत्री जयकुमार गोरे याना खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण म्हणाले.

 

 

 

 

यावेळी भाजप शराध्यक्षा रोहिणी तडवळकर,प्रभाग ६ चे भाजपचे पॅनल प्रमुख तथा नगरसेवक गणेश वानकर, आरोग्य समितीचे सभापती तथा नगरसेवक सुनील खटके, नगरसेविका सोनाली गायकवाड आणि नगरसेविका मृण्मयी गवळी ,
विमल कोरे,विठ्ठल वानकर,समर्थ वानकर,महादेव गवळी,शरद निकम,अर्जुन गायकवाड,भारत खाडे,दीपक भातलवंडे ,गणेश रणदिवे,अरुण जाधव,संतोष कोरे,बिट्टू शिंदे ,विष्णू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
==================
दुष्काळात वानकर
परिवार धावला
==================
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठी आहे.समाजसेवक म्हणून वानकर परिवाराकडून बळीराजाला आधार देण्यासाठी चारा आणि पाण्याचा चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे.मागील वर्षी आणि यंदासुद्धा दुष्काळामध्ये हा
परिवार शेतकऱ्यांसाठी धावून आला आहे.पालकमंत्री जयकुमार गोरे यांना अभिप्रेत असलेला हा उपक्रम असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
==================
६० टन चारा आणि
तीन टँकर पाणी
==================
ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि पशुपालकांना बसतो. जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, चाऱ्याची व्यवस्था करणे आणि दैनंदिन पशुपालनाचा खर्च भागविणे ही मोठी आव्हाने सध्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहेत . अशा परिस्थितीत टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि चारा वाटप यांसारखे उपक्रम शेतकरी कुटुंबांना दिलासा देणारे ठरू शकतात.त्यामुळे शिवप्रकाश कृषी आणि विज्ञान मंडळाच्यावतीने २० टेम्पो ६० टन ओला चार आणि प्रत्येकी १२ हजार लिटरचे ३ पाण्याचे टँकरची व्यवस्था करण्यात अली आहे.उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे,पाकणी ,बेलाटी,हिरज ,शिवणी ,पाकणी ,डोणगांव ,कवठे,तेलगाव ,समशापुर ,बसवेश्वर नगर,गणेश नगर तांडा,कोंडी,देशमुख वस्ती , आनंद नगर,डफळेकर नगर या ठिकाणी टंचाईग्रस्त गावात चार आणि पाण्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय वानकर यांनी सांगितले.
================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button